Priyanka Chopra 
Latest

Priyanka Chopra : समुद्राच्या लाटांवर देसी गर्लचा हॉट अंदाज, पहा सुंदर Video

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : देसी गर्ल प्रियांका चोप्रा कधी हॉलिवूड प्रोजेक्ट तर कधी इंटरनॅशनल इवेंट तर कधी आपल्या फॅमिलीमुळे चर्चेत राहते. पणस आथा आपल्या बिझी लाईफमधून वेळ काढून प्रियांका (Priyanka Chopra) विकेंड एन्जॉय करताना दिसली. ती सध्या दुबईमध्ये व्हेकेशन एन्जॉय करताना दिसतेय. येथून प्रियांकाने काही फोटो आणि व्हिडिओ शेअर करून सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. (Priyanka Chopra)

प्रियांका चोप्रा हिवाळ्यातही तिच्या हॉट फोटोंनी इन्स्टाग्रामवर तापमान वाढवत आहे. खरंतरं प्रियांकाने रविवारी सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये काही व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती समुद्राच्या मधोमध लाटांच्या झुल्यावर सनबाथ घेतना दिसत आहे. तिने विकेंडचा शनिवार आणि रविवार दुबईमध्ये घालवला आहे.

रेड सी फेस्टमधून दुबईत

प्रियांका चोप्राने अलीकडेच रेड सी फिल्म फेस्टिव्हलमध्ये भाग घेतला होता. ज्यासाठी ती UAE मध्ये होती. उत्सवानंतर आता ती थेट दुबईला गेली आहे. बोटवर ती समुद्राच्या लाटांमध्ये यलो स्विमसूटमध्ये दिसतेय.

एका फोटोमध्ये ती बोटीच्या फरशीवर पडून लाटा आणि सूर्यप्रकाशाचा आनंद घेताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोत प्रियांका कॅज्युअल व्हाईट आणि पिंक कलरच्या ड्रेसमध्ये ड्रिंकचा आनंद घेताना दिसत आहे. एका फोटोत ती मावळत्या सूर्यासोबत सेल्फीही काढला आहे. ती एका सुंदर पोशाखात, हातात पक्षी घेऊन बोटीवर मित्रासोबत पोज देताना दिसत आहे.

वॉटर राईडचा आनंद

यासोबतच प्रियांकाने या व्हेकेशनमध्ये वॉटर राईडचाही आनंद लुटला आहे. तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती वॉटर बाईक चालवताना दिसत आहे. पोस्ट शेअर करताना प्रियांकाने लिहिले की, "वीकेंड व्हाईब्स." हे फोटो पाहून प्रियांकाचे चाहते तिचे कौतुक करताना थकत नाहीत. तो प्रियांकाला विचारत आहे की, तिला दुबईमध्ये सर्वात जास्त काय आवडले?

या चित्रपटात दिसणार

प्रियांका चोप्राच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, प्रियांका चोप्रा शेवटची 'मॅट्रिक्स ४' मध्ये दिसली होती. आता ती लवकरच रुसो ब्रदर्सच्या 'सिटाडेल' या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. बॉलिवूडमध्ये ती पुढे फरहान अख्तरच्या 'जी ले जरा' मध्ये कतरिना कैफ आणि आलिया भट्टसोबत दिसणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT