Priyanka Chopra 
Latest

Priyanka Chopra : प्रियांका चोप्राच्या परिवाराने भाड्याने दिला पुण्यातील बंगला, महिना इतके लाख मिळणार!

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रियांका चोप्राच्या परिवाराने पुण्यातील आपला एक बंगला भाड्याने दिल्याचे वृत्त आहे. (Priyanka Chopra) चोप्रा फॅमिलीने एक को-लिव्हिंग आणि को-वर्किंग कंपनीला आपला बंगला भाड्याने दिला आहे. अभिनेत्री प्रियांका चोप्राची आई मधु चोप्रा आणि भाऊ सिद्धार्थ चोप्राने कंपनीसोबत करार केला आहे. (Priyanka Chopra)

६ लाखांची सिक्युरिटी डिपॉझिट

प्रियांका चोप्राच्या या नव्या घरासाठी कायदेशीर प्रक्रिया केली गेली आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, २१ मार्च रोजी मधु चोप्रा आणि सिद्धार्थ चोप्राच्या प्रॉपर्टीसाठी रजिस्टर केलं गेलं आहे. पुण्याच्या या बंगल्यासाठी ६ लाख रुपयांचे सिक्युरिटी डिपॉझिट देखील जमा केलं आहे.

चोप्रा फॅमिलीला या बंगल्याचे महिन्याला २ लाख ६ हजार रुपये मिळतील. पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये असणाऱ्या या बंगल्याचा आकार ३७५४ वर्ग फूट आहे. ग्राउंड फ्लोर २१८० वर्ग फूट, बेसमेंट एरिया ९५० वर्ग फूट आहे आणि गार्डन एरिया २२३२ वर्ग फूट आहे. पार्किंग एरिया ४०० वर्ग फूट आहे.

प्रियांकाने विकलं आपलं पेंट हाऊस

प्रियांकाचे मुंबईमध्ये दोन पेंट हाऊस होते, तिने ते विकले होते. दोन्ही पेंटहाऊस ओशिवारा, अंधेरी, मुंबईमध्ये लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये आहे, त्याचे क्षेत्र २२९२ वर्ग फूट आहे. तिने दोन्ही पेंटहाऊस सहा कोटींमध्ये विकले होते. प्रियांका चोप्राने याआधी अंधेरीच्या लोखंडवालामध्ये एक कमर्शियल प्रॉपर्टी देखील ७ कोटींमध्ये विकली होती. अभिनेत्रीने एका डेंटिस्ट कपलला विकलं होतं, त्ययांनी आधी २०२२ मध्ये ही जागा भाड्याने दिली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT