Latest

Women’sday 2023 : वयाच्या आठव्या वर्षी लग्न, दोन मुलांची आई… आता आहे बॉडीबिल्डिंग क्षेत्रातील चमकतं नाव

अमृता चौगुले

पुढारी डिजीटल : महत्त्वकांक्षा असली की त्यापुढे कोणताही अडथळा हा नगण्य ठरतो. असे अडथळे पार करणारे मग व्यक्ति या व्याखेपासून व्यक्तिमत्त्व यापर्यंतचा टप्पा सहज गाठतात. त्यापैकीच एक नाव आहे प्रिया सिंह हिचं. काही दिवसांपूर्वीच थायलंड येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय महिला बॉडीबिल्डिंग स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवणारी प्रिया मेघवाल पहिली राजस्थानी महिला बनली.

बिकानेर ते राजस्थान हा प्रियाचा प्रवास म्हणावा इतका सोपा नक्कीच नव्हता. शिक्षण पाचवीपर्यंतच झालेलं. कारण त्यानंतर म्हणजेच वयाच्या आठव्या वर्षी तिचं लग्न लावून दिलं. लग्नानंतर कोणत्याही स्त्री प्रमाणेच प्रियावरही घराची जबाबदारी पडली. त्यातच तिच्यावर दोन मुलांची जबाबदारीही पडली.

इतक्या कमी वयात लग्न, पुरेसं शिक्षण नाही, घरची जबाबदारी, दोन मुलांना मोठं करण्याची जबाबदारी याशिवाय गावात असलेली घुंघट आणि पडदा पद्धत. या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डर होण्याचं स्वप्न पाहिलं असतं तर नक्कीच त्या महिलेला इतरांनी वेड्यात काढलं असत. पण म्हणतात ना, कोशिश करनेवालों की कभी हार नही होती.  आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी प्रियाने जीममध्ये नोकरी सुरू केली.

तिथूनच तिला महिलांसाठी असलेल्या बॉडीबिल्डिंग क्षेत्रातील संधींविषयी समजलं. यानंतर  प्रियाने बॉडी बिल्डिंगची तयारी सुरू केली. यादरम्यान प्रिया बॉडी बिल्डिंगचा पोशाख घालून प्रॅक्टिसला जायची त्यावेळी तिच्यावर टीकाही झाली. जीमला जाण्यातील सातत्य, प्रॅक्टिसमधील सातत्य आणि तीव्र इच्छाशक्ती या त्रिसूत्रीवर प्रियाने बॉडी बिल्डिंगचा गड काबिज केला. मुलांचं आवरणं, त्यांना मोठं करणं, घरचा आर्थिक भार उचलणं यासोबतच बॉडीबिल्डर म्हणून स्वत:वर मेहनत घेणं ही सगळी आव्हानं प्रियाने तिच्या सक्षम खांद्यावर पेलली.  प्रियाने आतापर्यंत अनेक बॉडीबिल्डिंग स्पर्धा जिंकल्या आहेत. याशिवाय ती तीन वेळा 'मिस राजस्थान' ही बनली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT