Latest

Prithviraj Chavan | काँग्रेसच्या ध्येय धोरणांवर टीका करणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केली भूमिका, म्हणाले….

दीपक दि. भांदिगरे

कराड : पुढारी वृत्तसेवा; काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणांवर सडकून टीका करणारे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी आज कराडमधील पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. मी काँग्रेस सोडणार असल्याच्या बातम्या कुणी पेरल्या आहेत हे माहित नाही. पण मी काँग्रेसच्या विचाराचा आहे. आम्हाला भिती आहे की लोकशाही धोक्यात आहे. काँग्रेस पक्षात पूर्णवेळ अध्यक्ष असावा. अशी मागणी ऑगस्ट २०२० मध्ये केली होती. सोनिया गांधी यांनी ही मागणी मान्य केली. त्याबद्दल त्यांचे जाहीर आभार मानल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक १७ ऑक्टोबरला होत आहे. कोविडमुळे अध्यक्षांचा थेट संवाद होत नव्हता. त्यांच्या भेटीसाठी वेळ मिळाली नाही. यामुळे अध्यक्षांना पत्र लिहिलं होतं. ते गोपनीय होतं. ते पत्र फोडलं. काँग्रेसचा अध्यक्ष थेट नेमणुकीमुळे होऊ नये. त्यासाठी निवडणूक व्हावी. पक्ष लोकशाही पद्धतीने चालयचा असेल तर अध्यक्षपदाची निवडणूक व्हावी, असे चव्हाण यांनी म्हटले आहे.

काँग्रेस पक्ष लोकशाही पद्धतीने चालला पाहिजे. भाजपला एकमेव काँग्रेसच तोंड देऊ शकतो, असेही ते म्हणाले. गोव्यातील काँग्रेसच्या आठ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या मुद्यावर बोलताना चव्हाण यांनी गोव्यात दुर्दैवी घडले असल्याची प्रतिक्रिया दिली. काश्मीरमधील सर्व लोक गेलेत. आता ही दुसरी घटना आहे. देशात हा पॅटर्नच सुरु असल्याचे त्यांनी नमूद केले.

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला नेण्याच्या घटनेवर त्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने हा दुर्दैवी निर्णय आहे. फॉक्सकॉनची बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरु होती. अचानकपणे गुजरात चित्रात नव्हते. एकदम हा प्रकल्प गुजरातला नेला. पंतप्रधानांच्या हस्तक्षेपामुळे हे झाले आहे. गुजरातचे महत्व वाढेल आणि मुंबईचे महत्व कसे कमी होईल असा पंतप्रधानांचा प्रयत्न आहे. एवढा मोठा प्रकल्प हायजॅक करण्याचा प्रयत्न याआधी कधीच झाला नव्हता, अशी शब्दांत चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी भाजपवर टीका केली आहे.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT