पूजा सावंत-सिद्धेश 
Latest

Pooja Sawant Halad : साजणा तू..सावरलं! पूजा सावंतचे हळद समारंभाचे फोटो व्हायरल

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत ही सिद्धेश चव्हाणसोबत लग्न बंधन अडकली. तिच्या लग्नातील सुंदर फोटो आपण पाहिलेच आहेत. (Pooja Sawant Halad ) आता तिचे हळद समारंभातील फोटो आणि व्हिडिओज व्हायरल झाले आहेत. या सोहळ्यात पूजाने जांभळ्या रंगाच्या लेहंगा परिधान केलेला दिसतो. तर सिद्धेशने जांभळ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती. दोघांच्याही पोषाखावर मिरर वर्क दिसले. पूजाने हातात, हिरव्या बांगड्या आणि फुलांची ज्वेलरी घातली होती. कानात फुलांचे डुल आणि बिंदी असा शृंगार केला होता. (Pooja Sawant Halad )

पुजाने एका पोठोपाठ एक फोटोज आणि व्हिडिओज शेअर केले आहेत. हळद सोहळ्यावेळी फोटो पोझ देत असताना त्यांच्यावर होणारा पुष्प वर्षाव कॅमेराबद्ध करण्यात आला.

यावेळी दोघेपण खूप आनंदात दिसले. एका फोटोला कॅप्शन देताना पूजाने लिहिलं-साजणा तू ….. सावरलं ♥️??. या कपलचे खूप सारे फोटोज इन्स्टावर पाहायला मिळतात. शिवाय कुटुंबीयांसोबतचा एक फोटोदेखील तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पाहायला मिळतो.

काही फोटोमध्ये पूजा-सिद्धेश कॅमेरासाठी रोमँटिक पोझ देताना दिसत आहेत. हे फोटो अपलोड केल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांच्या अभिनंदानाचा वर्षाव केला.

दरम्यान, नववधू पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाणने मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले. या जोडप्याचे फोटो पाहायला मिळतात. पूजाने ते फेसबूकवरदेखील शेअर केले होते.

पूजाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हे फोटो शेअर केले होते.

या स्टोरीमध्ये सिद्धेशला टॅग करत इन्फीनिटी आणि एव्हिल आयचा इमोजी टाकला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT