पुढारी ऑनलाईन डेस्क : खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नून याच्या हत्येचा कट भारताने रचला आहे, असा धक्कादायक आरोप काही दिवसांपूर्वी अमेरिकेने केला होता. या आरोपावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
ब्रिटनमधील 'द फायनान्शिअल टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, काही घटनांमुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध बिघडणार नाहीत. काहीजण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली धमकावण्यात गुंतले आहेत आणि हिंसाचाराला चिथावणी देत आहेत, असा स्पष्ट करत परदेशातील दहशतवादी गटांच्या कारवायांबद्दल त्यांनी तीव्र चिंता केली.
सुरक्षा आणि दहशतवादविरोधी सहकार्य हे भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांचे महत्त्वाचे घटक आहेत. काही घटनांना दोन देशांमधील परराष्ट्र संबंधांशी जोडणे योग्य आहे. भारत आणि अमेरिकेत मजबूत द्विपक्षीय समर्थन आहे. या दाेन देशांमधील संबंध परिपक्व आणि स्थिर भागीदारीचे स्पष्ट सूचक आहे," असेही पंतप्रधान माेदी यांनी यावेळी स्पष्ट केले.
हेही वाचा :