Latest

Narendra Modi : राष्ट्रकूल स्पर्धेतील भारतीय खेळाडूंचे प्रदर्शन देशातील युवकांसाठी प्रेरणादायी : पीएम मोदी

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : राष्ट्रकूल स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचे हे फक्त सेलिब्रेशन नाही तर, विविध प्रांतातील खेळाडू एकत्र आल्याने, देशातील 'एक भारत श्रेष्ठ भारत' ही भावना वाढणारा हा प्रसंग आहे. येथील प्रत्येकाचे राष्ट्रकुल स्पर्धेतील प्रदर्शन हे देशातील युवकांना प्रेरित करणारे होते, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. राष्ट्रकूल स्पर्धेतील सहभागी आणि पदक विजेत्या खेळाडूंशी त्यांनी आज संवाद साधला.

बर्मिंगहम येथे झालेल्या राष्ट्रकूल स्पर्धेत भारताने एकूण ६१ पदके मिळाली आहेत. यामध्ये 22 सुवर्ण 16 रौप्य आणि २३ कांस्यपदकांचा समावेश आहे. याचे सेलिब्रेशन दिल्ली येथील त्यांच्या निवास्थानी झाले. यावेळी बोलताना ते म्हणाले, गेल्या वेळेच्या तुलनेत यावेळी ४ नवीन गेममध्ये खेळाडूंनी पदके घेत, एक नवीन मार्ग तयार केला आहे. लॉन बाल्सपासून ते अॅथलेटिक्सपर्यंत तुमची अभूतपूर्व कामगिरी झाली आहे. तुमच्या या कामगिरीमुळे देशातील नवनवीन खेळांमध्ये तरुणांची आवड वाढणार असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

तुम्ही सगळे तिथे स्पर्धा करत होता, पण इथे करोडो भारतीय परफॉर्म करत होते. तुमच्या खेळांवर देशवासीयांची नजर होती. तुमचे प्रदर्शन बघण्यासाठी अनेक देशवासी अलार्म लावून झोपले होते. राष्ट्रकूल स्पर्धेत आपल्या मुलींच्या कामगिरीने संपूर्ण देश उत्साहित झाला आहे. बॉक्सिंग, ज्युडो, कुस्ती अशा खेळात आपल्या मुलींनी ज्याप्रकारे वर्चस्व गाजवले ते आश्चर्यकारक होते, असे म्हणत पीएम नरेंद्र मोदींनी खेळाडूंशी संवाद साधला.

पाहा व्हिडिओ:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT