कर्जत : पुढारी वृत्तसेवा
स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने मारहाण करत, आरोपीने दहा लाखांची लूट करत घटनास्थळावरून पळ काढला. सदर घटना कर्जत येथील राक्षसवाडी येथे घडली. आरोपी सचिन आल्या पवार (वय 26, रा. राक्षसवाडी (ता. कर्जत) यास कर्जत पोलिसांनी केली आहे. न्यायालयात हजर केले असता, आरोपीस ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
घडलेली घटना अशी की, आरोपी ९ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास कोंभळी ते कर्जत रोड पासून आत २-३ किमी अंतरावरील शेतात घेऊन गेला. यातील फिर्यादी संतोष रामचंद्र घुडे, (वय ४३) आणि त्यांचा मित्र यातील साक्षीदार हे दोघेही आरोपी विठ्ठल जाधव (खरे नाव माहित नाही) याच्यासोबत शेतात गेले. या अनोळख्या ठिकाणी दहा ते बारा अनोळखी इसमांनी फिर्यादी व साक्षीदार यांना बोलावून, त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकत लाकडी दांड्याने मारहाण केली. स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडील रोख रक्कम दहा लाख रुपये व तीन मोबाईल हँडसेट असे एकूण १०१८००० रुपये किमतीचा मुद्देमाल लूटुन नेला. ही घटना समजताच कर्जत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, तपास सुरू केला.
तपासादरम्यान आरोपीस अटक करत, न्यायालयात हजर केले असता, आरोपीस ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेबाबत संबंधित आरोपीवर कर्जत पोलिस स्टेशनमध्ये भादवि कलम ३९५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक मोरे, सहाय्यक फौजदार अंकुश ढवळे करीत आहेत.
हेही वाचलत का ?