Plastic stools  
Latest

Plastic stools : प्लास्टिकच्या स्टूलमध्ये का असते छिद्र?

Arun Patil

नवी दिल्ली : आपण दैनंदिन जीवनात वापरत असलेल्या अनेक वस्तूंबाबत आपल्यालाच पुरेशी माहिती नसते. प्लास्टिकचे छोटे स्टूल (Plastic stools) अनेक घरांमध्ये असतात. अशा स्टूलच्या पृष्ठभागावर गोलाकार छिद्र असते. त्याचे प्रयोजन काय याचा कधी विचार केला आहे का?

प्लास्टिकच्या वस्तू बनवणार्‍या फॅक्टरी ब्रँडेड असोत किंवा स्थानिक, त्या प्रॉडक्शनसाठी विज्ञानाच्या काही सामान्य नियमांचे पालन करीत असतात. स्टूल (Plastic stools) जगाच्या कोणत्याही भागात बनवला जात असला तरी त्याच्या मध्यभागी असे छिद्र असतेच. ते जाणीवपूर्वकच बनवलेले असते. अनेकांना वाटू शकेल की स्टूल उचलत असताना मदत म्हणून हे बनवलेले असेल; पण हेच त्याचे कारण नाही. घर असो किंवा दुकान, अनेक ठिकाणी अशा प्लास्टिक स्टूल्सना एकावर एक ठेवले जात असते. जर या स्टूलच्या पृष्ठभागावर असे छिद्र नसेल तर हे स्टूल्स एकमेकांना चिकटतात.

एअर प्रेशर आणि व्हॅक्यूममुळे त्यांना वेगळे करण्यासाठी मोठी ताकद लागू शकते. त्यांना खेचून अलग करणे हे सोपे काम राहणार नाही. अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी हे छिद्र बनवले जात असते. अन्यही काही कारणे यामागे असतात. जर एखादी अधिक वजनाची व्यक्ती स्टूलवर उभी राहिली तर स्टूल तुटू नये यामध्येही या छिद्राची भूमिका असते. तसेच प्रत्येक स्टूलमध्ये (Plastic stools) असे छिद्र बनवल्याने प्लास्टिकच्या सामग्रीची काही प्रमाणात बचतही होत असते.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT