Chain snatching incident : रात्री 10 वाजता मोटरसायकलवरुन जाणाऱ्या जोडप्यास लुटण्याचा प्रकार इंदोरी येथे घडला. शुक्रवारी(दि.२५) रात्री १०वा.सुमारास वडगाव मावळ येथून लग्न समारंभावरुन मोटरसायकल दीपक रामचंद्र ढोरे (वय-५५ रा.इंदोरी) आणि त्यांची पत्नी मेघा दीपक ढोरे (वय-५० रा.इंदोरी) हे इंदोरी येथे जात होते. तळेगाव-चाकण रोडवर कोटेश्वर वाडी फाट्याजवळ त्यांचे मोटर सायकलला २ अज्ञातांनी मोटर सायकल आडवी घालून ढोरे यांची गाडी अडवली.
मेघा ढोरे यांचे सोन्याचे सुमारे ८ तोळ्याचे मंगळसुत्र हिसकावून नेले. यावेळी झालेल्या झटापटीत मेघा जखमी झाल्या असून त्यांना पोटाला,डोक्याला आणि हाताला लागले असून त्यांना तळेगाव दाभाडे येथील रुग्णालयात दाखल केले आहे. पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत रेळेकर करत आहेत.