धक्कादायक! वाल्हेकरवाडी येथे धारदार शस्त्राने भोसकूनम हिलेची हत्या File Photo
पिंपरी चिंचवड

Crime News: धक्कादायक! वाल्हेकरवाडी येथे धारदार शस्त्राने भोसकूनम हिलेची हत्या

पुढारी वृत्तसेवा

Chinchwad Crime News: वाल्हेकरवाडी येथे धारदार शस्त्राने भोसकून महिलेची हत्या करण्यात आली. ही घटना बुधवारी (दि. 16) सकाळी अकरा वाजताच्या सुमारास लक्ष्मीनगर, वाल्हेकरवाडी, चिंचवड (Chinchwad) येथे उघडकीस आली. ज्योती केसकर असे खून झालेल्या माहिलेचे नाव आहे.

चिंचवड पोलीस (Police) ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योती वाल्हेकरवाडी परिसरातील एका हॉटेलमध्ये कामाला होत्या. त्या मूळच्या बेळगाव येथील रहिवासी असून त्यांचे पती व मुले गावी असतात. ज्योती या आपल्या एका मैत्रिणीसह वाल्हेकरवाडी परिसरात राहण्यास होत्या.

दरम्यान, अज्ञात व्यक्तीने ज्योतीच्या पोटात धारदार शस्त्राने भोकसून तिचा खून केला. त्यानंतर बाहेरून कडी लावून तो निघून गेला. शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी ज्योतीला त्वरित रुग्णालयात (Hospital) दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. घरातील कोणतेही मौल्यवान साहित्य चोरीला गेले नसल्याने हा खून चोरीच्या उद्देशाने झाला नसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. चिंचवड पोलीस या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT