तळेगाव दाभाडे शहराला पाणीपुरवठा करणा-या यंत्रणेला सतत अडथळे येत आहेत. गेल्या काही दिवसात सोमाटणे येथील पाणीपुरवठा करणारी मुख्यदाब नलिका सतत लिकेज होत असल्यामुळे तळेगाव दाभाडे शहराचा पाणीपुरवठ्यात अडचणी येत होत्या. आता सोमाटणे जॅकवेल व चौराई जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युतविषयक व इतर देखभाल दुरुस्तीची कामे करण्याकरिता गुरुवारी(दि.०५)सुमारे १०वा.पासून ते शनिवारी(दि.०७)१०वा.पर्यंत संपूर्ण तळेगाव दाभाडे गाव भाग व स्टेशन भागातील वडगाव फाटा(चाकण फाटा) आणि स्टेशन चौक परिसरातील पाणीपुरवठ्यास अडचण येणार आहे. यामुळे तळेगाव आणि परिसरातील नागरिकांची गैरसोय होणार आहे.