पिंपरी: पत्नीने पतीला आत्महत्येस प्रवृत्त केले, तर पतीचा मृतदेह दूर नेऊन फेकल्याचे उघडकीस आले. 14 जून रोजी जगतापनगर, थेरगाव येथे घडलेल्या घटनेप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
तय्युबशहा उस्मानशा (रा. जगतापनगर, थेरगाव) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा तोसीफ तय्युब शहा यांनी गुरुवारी (दि. 19) काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Latest Pimpri News)
पोलिसांनी तय्युब शहा यांची पत्नी (32), साहिल कैलास घाडगे (21) या दोघांना अटक केली आहे. तसेच, एका अल्पवयीन मुलाविरोधातही गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तोसीफ याचे वडील तय्युब शहा उस्मानशा यांना पत्नीने आत्महत्येस प्रवृत्त केले. त्यामुळे त्यांनी 14 जून रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपी पत्नी हिच्या सांगण्यावरून आरोपी साहिल याने अल्पवयीन मुलाला सोबत घेऊन मृतदेह मावळ तालुक्यातील दारूंब्रे या गावच्या हद्दीत फेकून दिल्याचे समोर आले आहे. काळेवाडी या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.