हिंजवडी मेट्रो pudhari
पिंपरी चिंचवड

हिंजवडी मेट्रोची लवकरच ट्रायल रन ; चेन्नईतून पुण्यात मेट्रोचे कोच दाखल

कोचची तपासणी सुरू

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी : माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रगतीपथावर असून, या मार्गावरून धावणार्‍या मेट्रोचे कोच श्रीसिटी चेन्नई येथून नुकतेच दाखल झाले आहेत. या मार्गाच्या पहिला टप्प्यातील आठ किलोमीटरदरम्यान कोचची ट्रायल रन घेण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्यक्षात ऑक्टोबर 2025 पर्यंत मेट्रो सुरू होईल, असे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

माण-हिंजवडी ते शिवाजीनगर हा मेट्रो प्रकल्प पीएमआरडीएकडे आहे. पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्त्वावर प्रकल्पाचे काम सुरू आहे. प्रकल्पाच्या कामातील दिरंगाईमुळे मपीएमआरडीएफने ठेकेदाराला दंडात्मक कारवाईचा इशारा देत काम पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ दिली. त्यानंतर जुलैपासून काम वेगाने सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, यापूर्वी वेगवेगळ्या कारणांनी या प्रकल्पाचा वेग कमी होता. त्यानंतर संबंधित मेट्रो उभारणार्‍या कंपनीला नोटीस दिल्यानंतर कामाची गती वाढली.

नव्याने दाखल झालेल्या मेट्रो संचाची तपासणी सुरू आहे . डेपोमध्ये एक किलोमीटरचा मार्ग तयार केला आहे. त्यावरती त्याची तांत्रिक तपासणी पूर्ण केली जाते. त्यानंतर सीएमआरएस (कमिश्नर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टी) यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. पुढील पाच ते सहा महिन्यांमध्ये प्रत्यक्षामध्ये मेट्रो मार्गावर त्याची तपासणी केली जाईल.
रिनाज पठाण, मुख्य अभियंता, पीएमआरडीए

हिंजवडी (माण, मेगापोलिस) ते शिवाजीनगर हा पुणे आणि पिंपरी-चिंचवड या शहरांना जोडणारा मेट्रो प्रकल्पातील तिसरा मेट्रो मार्ग आहे. हा संपूर्ण मार्ग उन्नत असून, पुणे-बंगळुरू महामार्ग आणि मुळा नदीवरून जात आहे. प्रामुख्याने बाणेर, सकाळनगर आणि सिव्हिल कोर्ट स्थानकांची कामे शिल्लक आहेत. यांसह विविध ठिकाणी जिने आणि अकरा स्थानकांचे महत्त्वाचे काम बाकी आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर मेट्रोची मट्रायल रनफ घेण्यात येणार आहे.

आतापर्यंत पीएमआरडीएच्या मेट्रो प्रकल्पात गेल्या वर्षी एक तर गेल्या आठवड्यात एक अशा दोन ट्रेन अर्थात दोन संच दाखल झाले आहेत. मेट्रोचा तिसरा आणि चौथा संचदेखील मार्चअखेर उपलब्ध होणार असल्याचे पीएमआरडीए प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मेट्रोच्या एका संचामध्ये तीन कोच आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT