इंदुरी : येथील कुंडमेळ्यात पर्यटकांची संख्या वाढत आहे. मात्र त्यांच्या सुरक्षेसाठी पोलिस बंदोबस्त नसल्याने चोरटे पर्यटकांच्या बॅगा, मोबाईल, पैशावर डल्ला मारत आहेत. शाळा, काॅलेज यांना सुट्टी तर पावसाने उघडीप दिल्याने पर्यटकांनी कुंडमळ्यावर गर्दी केली होती.
काही तरुण -तरुणी पाण्यात डुबक्या मारण्यात मग्न झाली होती. तर काहीजण धबधब्याच्या खाली सेल्फी काढण्यात दंग झाले होते. अशा संधीचा फायदा चोरट्यांनी घेतला. एक जण लोखंडी पुलावरुन टेहळणी करुन खाली थांबलेल्या साथीदाराला फोन करून मेसेज देतो. मेसेज मिळताच चोरटा बॅग घेऊन पसार व्हायचा अशा पद्धतीने चोऱ्या होत असल्याचे निदर्शनास आले आहे. पर्यटकांनी कुंडमळा येथे आपल्या साहित्याची काळजी घ्यावी. ग्रुपने आले असल्यास एकाला साहित्य सांभाळण्यासाठी बसवावे.अशा सुचना स्थानिकांनी या घटनेनंतर पर्यटकांना दिल्या.