तरुणाचे अपहरण करून दिले सिगारेटचे चटके  File Photo
पिंपरी चिंचवड

Crime News | तरुणाचे अपहरण करून दिले सिगारेटचे चटके

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

तरुणाचे अपहरण करत त्याला बेदम मारहाण करण्यात आली. सिगारेटचे चटके देऊन चाकूने त्याच्या गळ्याला दुखापत केली. ही घटना रविवारी (दि. ६) रात्री साडेदहाच्या सुमारास देहूफाटा, आळंदी येथे घडली.

विपुल प्रवीण कळसकर (२०, रा. आळंदी) यांनी याप्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अजित शेंडगे, बाळासाहेब गायकर, बाबासाहेब शिरोळे (रा. कडा, ता. आष्टी, जि. बीड), शेंडगे सर, प्रवीण खेडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पिंपरी चिंचवड शहरातील एका खाजगी कंपनीत काम करतात. दरम्यान, रविवारी रात्री खोलीमध्ये झोपले असताना आरोपी तिथे आले. 'तू आमच्या मुलीला कुठे ठेवले आहे' असे म्हणत आरोपींनी विपुल यांना जबरदस्तीने बाहेर आणले.

विपुल यांना एका कारमध्ये बसवून त्यांना लोखंडी पाईप, वायरने बेदम मारहाण करण्यात आली. तसेच, चाकूने गळ्याला दुखापत करण्यात आली. विपुल यांचे अपहरण करताना त्यांच्या खोलीतील सहकाऱ्यांना 'घडलेल्या घटनेबाबत कोणास काही सांगितल्यास तुम्हाला पुण्यात राहू देणार नाही' अशी धमकी दिली.

विपुल यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवून रात्रभर सिगारेटचे चटके देण्यात आले. तसेच, अंगावर थंड पाणी टाकले. पहाटे पाचच्या सुमारास त्यांना त्यांच्या मूळ गावी वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. दिघी पोलिस तपास करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT