अमिन खान
तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यात एज्युकेशन हब म्हणून उदयास आलेल्या तळेगाव दाभाडे शहर आणि लगतच्या ग्रामीण भागातील विविध शैक्षणिक खासगी संस्थामध्ये सध्या मिशन डोनेशन-अॅडमिशनचा सीझन जोर धरू लागला आहे. त्यासाठी संस्थाचालक आणि संचालक मंडळींनी गेल्या महिनाभरापासून केलेल्या कॉर्पोरेट स्टाईल मिशन डोनेशन-अॅडमिशनच्या बिझनेस प्लॅनिंगचे इम्पिमेन्टेशन करायाला सुरुवात केली आहे.
सुमारे 23 हजार विद्यार्थी आहेत. नवीन वर्गातील प्रवेशासाठी किमान 25 हजार रुपये डोनेशनची मागणी होत असून, तिला डेव्हलपमेंट फंड, स्वेच्छा देणगी अशा विविध गोंडस नावाने घेतले जात असल्याचे काही विद्यार्थी आणि पालकांनी पुढारीशी बोलताना सांगितले. व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी डोनेशनची रक्कम 50 हजार ते एक लाखापर्यंत असल्याचीही चर्चा आहे.
तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीत पाचवी ते दहावीच्या 34 शाळा आहेत. परिसरातील प्ले-ग्रुप प्रिस्कूल व केजी नर्सरी स्कूलची संख्या सुमारे 35 आहे. प्राथमिक, माध्यमिक शाळांची संख्या 40 तर उच्च माध्यमिक 4 आणि वरिष्ठ महाविद्यालय एक आहे. तंत्रशिक्षणाबरोबरच मेडिकल, फार्मसी, नर्सिंग या अभ्यासक्रमाच्या संस्थांमध्ये देखील प्रवेशासाठी गर्दी होत आहे. बीबीए, बीसीए, इंजिनिअरिंग, पत्रकारिता आदी व्यावसायिक कोर्सेसकडेही अनेक विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. इंग्लिश माध्यमांच्या खासगी शाळांसह प्रवेश प्रक्रिया सुरु असलेल्या बहुतांश संस्थामध्ये प्रवेशासाठी होड लागली असून तेथे डोनेशनचा मोठा बोलबाला सुरु असल्याची चर्चा गावभर सुरू आहे.
दहावी-बारावीच्या निकालानंतर पुढील वर्गातील प्रवेश प्रक्रियेचे काम प्रत्येक संस्थेत सुरू झाले आहे. याकामी बहुतांश खासगी संस्थांमधील प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी आणि काही संस्थांनी भाड्याने घेतलेले मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह यांची पलटण या मिशनवर दिमतीला लावण्यात आली आहे. त्यात प्ले-ग्रुप प्रिस्कूलिंग, केजी नर्सरी स्कूल, प्राथमिक, माध्यमिक वर्ग प्रवेशापासून ते 11वी आणि प्रथम वर्ष महाविद्यालयीन वर्गातील प्रवेश घेण्यासाठी पालकांची होड लागली आहे. विशेष म्हणजे विनाअनुदानित संस्थांबरोबरच शासकीय अनुदानित
काही संस्थांमध्ये प्रथम डोनेशन, नंतरच अॅडमिशन ही स्टॅटिजी स्ट्रिक्ट ठेवण्यात आल्याचे काही त्रस्त पालकांनी पुढारी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.