बोपखेल-खडकी पुल Pudhari
पिंपरी चिंचवड

बोपखेल-खडकी पुलाचा खर्च आणखी वाढला

ठेकेदाराला महापालिका देणार तब्बल 6 कोटी 54 लाख रुपयांचे वाढीव बिल

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी : बोपखेल - खडकी जोडणारा मुळा नदीवरील पूल वाहतुकीस 9 ऑक्टोबर 2024 रोजी खुला करण्यात आला. आता साडेपाच महिन्यानंतर या पुलाच्या कामासाठी आणखी 6 कोटी 53 लाख 88 हजार 463 रुपये ठेकेदाराला देण्यास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे.

बोपखल व खडकी जोडणार्‍या पुलाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 9 ऑक्टोबर 2024 ला झाले. त्या दिवसापासून या पुलावर वाहतुक सुरू झाली आहे. तो 1 हजार 856 मीटर लांब अंतराचा पुल आहे. या पुलावर 105 कोटी रूपयांपेक्षा अधिकचा खर्च महापालिकेने केला आहे. सी.एम.ई. प्रशासनाने 13 मे 2015 ला बोपखेलचा नागरी रस्ता वाहतुकीस बंद केला होता. त्यामुळे तेथील नागरिकांना 10 ते 15 किलोमीटर अंतराचा वळसा मारून ये-जा करावी लागत होती. नव्या पुलामुळे बोपखेलच्या रहिवाशांना साडेनऊ वर्षांनंतर हक्काचा जवळचा मार्ग उपलब्ध झाला आहे. नव्या पुलामुळे वाहतूक सुलभ झाल्याने त्या परिसरात मोठे गृहप्रकल्प निर्माण होत आहेत.

पुलावरून वाहतूक सुरू होऊन साडेपाच महिने झाले आहेत. असा असताना या पुलाच्या खर्चात आणखी 6 कोटी 54 लाख रूपयांची वाढ करण्यात आली आहे. मुळा नदीवर एका विशिष्ट वेळ मर्यादेमध्ये बोपखेलसाठी पुल बांधण्यास मुंबई उच्च न्यायालयाने जानेवारी 2019 ला महापालिकेस आदेश दिले होते. त्यानंतर महापालिकेने तातडीने निविदा प्रकिया राबविली. त्यावेळी महापालिकेच्या ताब्यात बोपखेलकडील 400 मीटरपैकी केवळ 21 टक्के जागा ताब्यात होती. पुल बांधण्याचे वर्कऑर्डर टी अ‍ॅण्ड टी इन्फ्रा. लि. ठेकेदार कंपनीस 20 जुलै 2029 ला देण्यात आली. कामाच्या मूळ मुदतीत ठेकेदाराने उपलब्ध जागेवर काम पूर्ण केले.

संरक्षण विभागाच्या खडकीकडील बाजूस काम करण्यास संरक्षण विभागाकडून 9 सप्टेंबर 2021 ला परवनागी देण्यात आली. वर्क ऑर्डर दिल्यानंतर दोन वर्षांनी ही परवानगी मिळाली. कोरोना महामारीमुळे काही महिने काम ठप्प होते. कामास अडथळा ठरणार्या अतिउच्च दाब वाहन तारा व टॉवर स्थलांतरीत करण्यसााठी अधिक वेळ गेला. ते काम 19 मे 2024 ला पूर्ण झाले. तसेच, रशिया-युक्रेन युद्धामुळे कच्चा तेलाचे दर वाढले. त्यामुळे ठेकेदाराचे मोठे नुकसान झाले. मुदतवाढीतील भाववाढ फरक म्हणून निविदा रक्कमेच्या 5 टक्के रक्कम देण्याची मागणी ठेकेदारांने महापालिकेकडे केली होती.

यासंदर्भात आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीची 17 फेबु्रवारी 2025 ला बैठक झाली. संबंधित ठेकेदाराला या कामासाठी मुदतवाढ भाव वाढ फरक देण्याच्या अधिन राहून स्थायी समितीने दिली होती. या सर्व बाबींचा विचार करून तसेच, सल्लागारांच्या शिफारशीनुसार मनुष्यबळ, साहित्य, माल, पेट्रोल, ऑईल व लुब्रीकंटस या बाबीचा दर वाढ लक्षात घेऊन 6 कोटी 53 लाख 88 हजार 463 रूपये ठेकेदारला अदा करण्यास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे. त्यामुळे बोपखेल पुलाचा खर्च आणखी वाढला आहे.

महापालिकेकडून विलंब झाल्याने शिल्लक बिल अदा

कोरोना महामारी, संरक्षण विभागाकडून काम करण्यास परवानगी देण्यास विलंब, अतिउच्चदाब वाहक तारा व टॉवर स्थलांतरासाठी थांबलेले काम आणि इतर कारणांमुळे अनेक महिने बोपखेल पुलाचे काम थांबले होते. महापालिका व इतर कारणांमुळे पुलाच्या कामास बराच विलंब झाला. त्यामुळे ठेकेदाराचे आर्थिक नुकसान झाले. दुसरीकडे भाव वाढ झाल्याने कामाचा खर्चही वाढला. ती दरवाढ ठेकेदाराला देणे बाकी होते.स्थायी समितीच्या मंजुरीनंतर ती रक्कम देण्यात येत आहे, असे महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT