तळेगाव - तळेगाव दाभाडे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सोमाटणे जॅकवेल मधील ट्रान्सफॉर्मरचे ऑइल टॉप अप करणे, विद्युत केबल बदलणे आदी दुरुस्तीची कामे करण्यासाठी गुरुवारी (दि.१४) सकाळी सुमारे १० वा.पासून रात्री ७ वा.पर्यंत संपूर्ण गाव भाग आणि स्टेशन भागातील वडगाव फाटा(चाकण फाटा) ते तळेगाव स्टेशन चौकाचे परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरावे असे आवाहन तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. (Latest Pimpri News)
तळेगाव दाभाडे शहरामध्ये पाणीपुरवठ्यास सतत व्यत्यय येत असतो याबाबत नागरिक हैराण झाले आहेत. याबाबत प्रशासनाने दखल घ्यावी अशी नागरिकांची मागणी आहे.आशिष खांडगे सामाजिक कार्यकर्ता तळेगाव.