पिंपरी: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एस. टी.) पिंपरी-चिंचवड आगारातून 27 सप्टेंबर रोजी साडेतीन शक्तिपीठ दर्शनासाठी विशेष बस सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती एसटी प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
ही यात्रा चार दिवसांची असून, पहिल्या दिवशी कोल्हापूर येथे महालक्ष्मीचे दर्शन नागरिकांना मिळणार आहे. त्याच दिवशी तुळजापूर येथील तुळजा भवानीचे दर्शन व रात्रीचा मुक्काम होईल. (Latest Pimpri News)
दुसर्या दिवशी माहूरला रेणूका माता दर्शन होईल. याच ठिकाणी दुसरा मुक्काम होणार आहे. तिसर्या दिवशी वणी येथील येथील सप्तशृंगी देवीचे दर्शन झाल्यानंतर पुण्याकडे प्रवास सुरू होईल. एसटी महामंडळाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन बुकींगची सोय उपलब्ध आहे, अशी माहिती स्थानकप्रमुख वैशाली कांबळे यांनी दिली.