Pimpri News: पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील अनधिकृत फ्लेक्स, जाहिराती, पोस्टर्स, किऑक्स, गॅन्ट्री आदी साहित्य तातडीने हटवावे, अन्यथा संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मंगळवारी (दि.7) दिला आहे.
पिंपरी चिंचवड शहरात अनधिकृत फ्लेक्स, जाहिराती, पोस्टर्स, किऑक्स, गॅन्ट्री आदी विरोधात कारवाई केली जात आहे. त्यासंदर्भात बैठक झाली. त्यात ते बोलत होते. बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर व क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.
क्षेत्रीय अधिकार्यांना आयुक्त सिंह यांनी विविध सूचना दिल्या. अनधिकृतपणे उभारण्यात येणार्या कमानी, मंडप, झेंडे, फलक याबरोबरच खासगी व सार्वजनिक जागेवर लावण्यात आलेले अनाधिकृत जाहिरातींवर संंबंधित क्षेत्रीय अधिकार्यांनी कारवाई करावी. कारवाईचे छायाचित्र, चित्रीकरण व पंचनामे करून ते संग्रही ठेवावे.
होर्डिंगवर परवाना क्रमांक, परवाना कालावधी, परवान्याचे ठिकाण आणि क्यूआर कोड आदी ठळकपणे दिसेल अशा दर्शनी ठिकाणी लावणे संबधित परवानाधारकास बंधनकारक आहे. विविध कामांसाठी तसेच, विविध सणांच्या दरम्यान तात्पुरते बूथ किंवा मंडप उभारताना कोणतेही होर्डिक किंवा फ्लेक्स लावता येणार नाही. वाढदिवसानिमित्त किंवा कोणतेही कोणतेही कार्यक्रम किंवा सणानिमित्त लावलेले फ्लेक्स व बॅनरवर कारवाई केली जाईल. परवनाधारक होर्डिंगधारकांनी परवाना शुल्क भरून नूतनीकरण करून घ्यावे अन्यथा त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे