पिंपरी : पुढारी वृत्तसेवा
नवरात्रोत्सवात नऊ वेगवेगळ्या भाज्या बनविल्या जातात. उपवास असल्याने भेंडी, पांडरा माठ, भोपळा, काकडी, भुईमूग शेंगा, मिरची, रताळी आदींना अधिक मागणी असल्याचे रविवारी बाजारात दिसून आले. (Navratri Vegetable Market)
मोशी उपबाजार, चिंचवड, आकुर्डी तसेच पिंपरी येथील भाजी मंडईतील किरकोळ बाजारात माठाची (राजगीरा) मोठ्या प्रमाणात आवक झाली. भुईमुगाच्या शेंगा आणि कराडच्या रताळींना अधिक मागणी राहिली. शेंगा प्रतिकिलो ८० तर रताळी ६० ते ७० रुपये दर होते. कोथिंबीर जुडी १० ते १५ तर इतर पालेभाज्या २० रूपये दराने विक्री होत आहेत.
कांदा २० ते ३५, बटाटा २० ते २५, लसूण २००, टोमॅटो ३५ ते ४०, गवार ५० ते ६०, मटार १००, घेवडा ३० ते ५०, दोडका ३०, कारले ३० ते ४०, काकडी २० ते ३०, वांगी २० ते ३०, फ्लावर २० ते ३०, कोबी २० ते २५, भेंडी ३० ते ४०, शेवगा ७०, आले ५० ते ६० रुपये प्रत्तिकिलो दराने विक्री होत आहे.
टोमॅटो २३७, दोडका ३१, कोबी २५७, कांदा ३९९, बटाटा ४८२, आले १७, गाजर ९०, गवार ४६, शेवगा ११, हिरवी मिरची १८३, काकडी २६१ क्लिंटल एवढी आवक झाली आहे. मोशी उपबाजारात पालेभाज्यांच्या एकूण ५१३०० गड्डी, फळे ५३० क्विंटल आणि फळ भाज्यांची झाली. आवक ३०३२ किंटल एवढी आवक
हंगाम संपत आल्याने मुळा आणि मटारची आवक घटली आहे. परिणामी दरात वाढ झाल्याने मुळा ४० रुपये जुडी तर मटार प्रतिकिलो २०० रुपये दराने विक्री होत आहे.
नवरात्रोत्सवातातील फळांना मोठी मागणी आहे. नागपूरची संत्री बाजारात दाखल झाली असून ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली आहे. सफरचंद, चिकू, पेरू, डाळींब, केळी, विलायची केळी, ड्रॅगन फुट, किवी, मोसंबी, पपई आणि संत्री आदींच्या दरात मागणी वाढल्याने दरवाढ झाली आहे. सफरचंद : १५० ते २००, चिकू: ८० पेरू: ६० ते ८० डाळीब १५० ड्रॅगन फुट १५०, किवी १२०, मोसंबी : ८० पपईः ५० संत्री: १०० - राजू तांबोळी, फळविक्रेता