पिंपरी: राज्यातील आरटीई (शिक्षण हक्क कायदा 2009) अंतर्गत 25 टक्के राखीव जागांसाठीच्या प्रवेशप्रक्रियेत यंदा मोठा बदल करण्यात आला आहे. 2026-27 शैक्षणिक वर्षासाठी पालकांना अर्ज करताना किमान दहा शाळांची निवड करणे अनिवार्य राहणार आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 17 फेबुवारी ते 10 मार्चदरम्यान राबवली जाणार असून प्रवेश लॉटरी पद्धतीने दिले जाणार आहेत.
अर्ज करताना किमान 10 शाळांचे पर्याय निवडणे बंधनकारक आहे. परिसरातील व जवळच्या शाळांना प्राधान्य देण्यात यावे. चुकीची अथवा अपूर्ण निवड केल्यास अर्ज बाद होण्याची शक्यता. सर्व पर्याय भरल्यानंतरच अर्ज सबमिट करता येणार. अर्ज सादर केल्यानंतर ठराविक कालावधीत दुरुस्तीची मर्यादित संधी लॉटरीपूर्वीच बदल करणे शक्य होणार आहे. लॉटरीनंतर शाळा बदलाची संधी अत्यंत मर्यादित असणार आहे.
दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे उद्देश आहे. उत्पन्न मर्यादा शासन नियमांनुसार आहे. सर्व आवश्यक कागदपत्रे अर्ज भरताना सबमिट करावी. वास्तव्याचा पुरावा आवश्यक आहे. एकाच बालकाचे दोन अर्ज बाद ठरविण्यात येणार.