पुण्याच्या मेट्रोचा पुढचा प्रवास आता वर्तुळाकार म्हणजेच रिंग मेट्रोच्या दिशेने होणार आहे. मंत्रिमंडळाने मान्यता दिलेले पुढचे मार्ग पूर्ण झाल्यावर पुण्याची चारही टोके एकमेकांशी वर्तुळाकार पद्धतीने जोडली जातील आणि कुठल्याही भागातून अन्य कुठल्याही भागात मेट्रोने जाता येईल.
राज्य मंत्रिमिंडळाच्या बैठकीत पुण्यातील दुसर्या टप्प्यातील दोन मार्गांना मंजुरी मिळाली आहे. त्या मंजुरीनुसार आता पुणेकरांना ‘खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला’ हा एक आणि ‘नळस्टॉप-वारजे-माणिकबाग’ हा दुसरा, अशा मंजुरी मिळालेल्या मार्गांवरून लवकरच प्रवास करता येणार आहे. तसेच, यामुळे आता मेट्रोने थेट हडपसर ते खडकवासला प्रवास करणे शक्य होईल. नळस्टॉपवरून सिंहगड रस्त्याला माणिकबागेपर्यंतसुद्धा जाता येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पहिल्या टप्प्यातील दोन्ही मार्गिकांचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर वनाज ते रामवाडी आणि पिंपरी ते स्वारगेट या मार्गावर प्रवासी प्रवास करत आहेत. आता शासनाकडून दुसर्या टप्प्यातील मार्ग सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यानुसार नुकतेच कात्रज-स्वारगेट मार्गाचे भूमिपूजन करण्यात आले. सोमवारी (दि.14) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला’ आणि ‘नळस्टॉप-वारजे-माणिकबाग’ या दोन मार्गिकेला मंजुरी मिळाली आहे.
पुण्याच्या विविध भागांना जोडणारी 87 किलोमीटर लांबीची मेट्रो रेल्वे लवकरच धावू लागणार असून, त्यामुळे पिंपरी व पुणेकरांना पिंपरी ते खराडी, पिंपरी ते कात्रज आणि खराडी ते खडकवासला, खराडी ते वनाझ अशा कोणत्याही ठिकाणी सहज भ—मण करता येणार आहे. मंजूर झालेल्या नव्या मेट्रो मार्गिकेमुळे सध्याचे मेट्रोचे जाळे लंब वर्तुळाकार आकारात जोडले गेले आहे. त्यामुळे माणिकबाग-नळस्टॉप-दिवाणी न्यायालय-रामवाडी- खराडी-मगरपट्टा-हडपसर-पुणे कॅन्टोन्मेंट रोड-स्वारगेट-राजाराम पूल ते माणिकबाग असा प्रवास आता शक्य होणार आहे. याखेरीज या मार्गावरील नळस्टॉपवरून वनाझपर्यंत, तर दिवाणी न्यायालयापासून- पिंपरीपर्यंतचा प्रवासही शक्य होणार आहे.
सध्या सिंहगड रस्ता, कर्वे रस्ता आणि सोलापूर रस्त्यावर मोठ्याप्रमाणावर वाहतूक कोंडी बघायला मिळत आहे. या मेट्रो मार्गिकांमुळे तेथील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच, या भागातील नागरिकांना पिंपरी-चिंचवड, रामवाडी, वनाझ आणि स्वारगेट इत्यादी ठिकाणी जलद व सुरक्षित प्रवास करणे शक्य होणार आहे.श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महा-मेट्रो
टप्पा-1
पिंपरी (पीसीएमसी) ते स्वारगेट (लाइन 1)
अंतर-17.53 किलोमीटर- सुरू झाला
वनाझ ते रामवाडी (लाइन 2)
अंतर- 15.75 किलोमीटर- सुरू झाला
पिंपरी (पीसीएमसी) ते निगडी
अंतर- 4.41 किलोमीटर- काम लवकरच सुरुवात होणार
स्वारगेट ते कात्रज
अंतर- 5.46 किलोमीटर- काम लवकरच सुरू होणार
टप्पा 2
खडकवासला ते खराडी
25.52 किलोमीटर- राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
नळस्टॉप ते माणिकबाग
6.12 किलोमीटर- राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
मेट्रोच्या एकूण 87 किलोमीटर अंतराला मान्यता
खडकवासला ते खराडी
25.52 किलोमीटर- राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
नळस्टॉप ते माणिकबाग
6.12 किलोमीटर- राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
मेट्रोच्या एकूण 87 किलोमीटर अंतराला मान्यता