Smart Bus Stops  File Photo
पिंपरी चिंचवड

Smart Bus Stops | स्मार्ट बसथांब्याची दुरवस्था

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडने कोट्यवधी रुपये खर्च करून शहरात आकर्षक आकाराचे स्मार्ट बस थांबे उभारले आहेत. त्या थांब्यांची नियमितपणे स्वच्छता केली जात असल्याने ते विद्रुप झाले आहेत.

थांब्यांवर मोठ्या प्रमाणात जाहिरातीचे पोस्टर चिकटविण्यात आले आहेत. त्यामुळे तो बसथांबा आहे की, जाहिरातीचे केंद्र असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. स्मार्ट सिटीत पिंपळे गुरव व पिंपळे सौदागर या भागांत स्मार्ट बसथांबे उभारण्यात आले आहेत.

विद्युत प्रकाश झोतात हे थांबे रात्रीच्या वेळेत उजळून निघतात; मात्र, त्याची देखभाल व स्वच्छता केली जात नसल्याने या थांब्याची दुरवस्था झाली आहे. थांब्याचे प्लास्टिकचे आवरण अनेक ठिकाणी फाडण्यात आले आहेत. तसेच, विद्युत ताराही तोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे थांबे विद्रूप झाले आहेत. स्मार्ट थांब्यांची अशी दुरवस्था झाल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT