स्नेहल बर्गे Pudhari
पिंपरी चिंचवड

Snehal Barge : पीएमआरडीएच्या सहआयुक्त स्नेहल बर्गे यांचे निधन

त्यांच्या पश्चात आई व बहीण असा परिवार

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) सहआयुक्त स्नेहल बर्गे (वय - 48) यांचे सोमवारी (दि. 24) पुणे येथे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई व बहीण असा परिवार आहे.

त्या सध्या पीएमआरडीएमध्ये जमीन व मालमत्ता विभागात सहआयुक्त म्हणून कार्यरत होत्या. 1999 मध्ये म्हणजेच वयाच्या 22 व्या वर्षी उपजिल्हाधिकारी संवर्गात पुणे येथे महसूल विभागात त्यांची निवड झाली होती. पुणे येथे जिल्हा पुरवठा अधिकारी, वाळवा तसेच हवेली येथील प्रांताधिकारी, महसुल विभागात उपजिल्हाधिकारी, विशेष भूसंपादन अधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले. अपर जिल्हाधिकारी म्हणून त्या पदोन्नतीने पीएमआरडीएमध्ये नियुक्त झाल्या होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT