PMRDA  Pudhari
पिंपरी चिंचवड

PMRDA Housing Lottery: पीएमआरडीएची 1,029 घरांची सोडत आज; 5,317 जणांचे नशीब आजमावणार

आकुर्डीत संगणकीय प्रणालीद्वारे पारदर्शक प्रक्रिया; थेट प्रक्षेपणाचीही सुविधा

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पेठ क्रमांक 12 आणि 30-32 मधील गृहप्रकल्पातील शिल्लक 1,029 सदनिकांची सोडत जाहीर केली आहे. बुधवार (दि. 8) सकाळी अकरा वाजता आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात ही सोडत पार पडणार आहे. या प्रक्रियेत 5,317 पात्र अर्जदारांचे भवितव्य ठरणार असून, मपीएमआरडीएफने याची सर्व तयारी पूर्ण केली आहे.

या गृहयोजनेसाठी एकूण 5,367 अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला होता. अर्जांच्या छाननीनंतर 50 अर्जदारांची कागदपत्रे अपूर्ण असल्याने त्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. त्यामुळे उर्वरित 5,317 अर्जदार आता या सोडत प्रक्रियेत नशीब आजमावतील.

ही सोडत प्रक्रिया मम्हाडाफने विकसित केलेल्या मआयएचएलएमएस 2.0फ या संगणकीय प्रणालीद्वारे राबविण्यात येणार आहे. यात मानवी हस्तक्षेपास वाव नसल्याने प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असेल, असे मपीएमआरडीएफच्या सहआयुक्त (जमीन व मालमत्ता) पूनम मेहता यांनी स्पष्ट केले. महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आणि मपीएमआरडीएफच्या सनियंत्रण समितीच्या देखरेखीखाली ही सोडत पार पडणार आहे.

सोडत प्रक्रियेवेळी इच्छुक अर्जदारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मपीएमआरडीएफने केले आहे. ज्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नाही, त्यांच्यासाठी थेट प्रक्षेपणाची सोय करण्यात आली आहे. सर्व पात्र अर्जदारांना एसएमएसद्वारे पाठविण्यात येईल, अशी माहिती ‌‘पीएमआरडीए‌’कडून देण्यात आली.

..अशी असेल सोडत

  • सदनिका आणि पात्र अर्जदारांची स्थिती

  • पेठ क्र. 12 (इडब्ल्यूएस): 81 सदनिकांसाठी 2,182 अर्जदार

  • पेठ क्र. 12 (एलआयजी): 393 सदनिकांसाठी 1,975 अर्जदार

  • पेठ क्र. 30-32 (इडब्ल्यूएस): 327 सदनिकांसाठी 456 अर्जदार

  • पेठ क्र. 30-32 (एलआयजी): 228 सदनिकांसाठी 704 अर्जदार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT