PMRDA  Pudhari
पिंपरी चिंचवड

PMRDA Complaints: पीएमआरडीएविरोधात तक्रारींचा पाऊस; दोनशेहून अधिक नागरिकांची धाव प्रशासनाकडे

287 पैकी 26 तक्रारी प्रलंबित; अतिक्रमण, बांधकाम परवानगीसंदर्भातील प्रश्न आघाडीवर

पुढारी वृत्तसेवा

..अशा आहेत तक्रारी

एकूण तक्रारी ः 287

निरसन झालेल्या

तक्रारी ः 261

प्रलंबित तक्रारी ः 26

पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात गत वर्षभरात 223 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी 207 तक्रारींचे निरसन झाल्याचा दावा पीएमआरडीए प्रशासनाने केला आहे. तर, केंद्र शासनाच्या पीजी पोर्टल अर्थात प्रशासकीय आणि लोक सुधारणा या ॲपवर 64 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. नागरिकांच्या या तक्रारींचे तातडीने निरसन करण्यात येत असून, त्याचा आढावादेखील घेण्यात येत असल्याचे प्रशासन विभागाने सांगितले.

गेल्या वर्षभरात वेगवेगळ्या विभागाच्या जवळपास 223 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामध्ये अतिक्रमण बांधकाम व निर्मूलन विभाग, जमीन व मालमत्ता विभाग तसेच, विकास परवानगी विभागाच्या सर्वांधिक तक्रारी असल्याचे दिसून येते. काही तक्रारी या कार्यालयात प्रत्यक्ष आलेल्या आहेत. तर, केंद्र शासनाच्या पीजी पोर्टल अर्थात प्रशासकीय सुधारणा आणि लोक शिकायत या पोर्टलवर 64 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी 54 तक्रारींचे निरसन करण्यात आले आहे.

प्राधिकरणातील वेगवेगळे तब्बल 11 विभाग आहेत. त्यात अतिक्रमण, बांधकाम नियंत्रण व निर्मूलन विभाग, प्रशासन विभाग, विकास परवानगी विभाग, नियोजन विभाग, अभियांत्रिकी 1 आणि 2, अग्निशामन नियंत्रण विभाग, जमीन व मालमत्ता विभाग, वित्त नियंत्रक आणि नियोजन हे महत्त्वाचे विभाग आहेेत. प्राधिकरणामध्ये पिंपरी चिंचवड, पुणे आणि ग््राामीण भागाचा मोठा परिसर जोडला आहे. नऊ तालुक्यांचा कारभार आहे. दरम्यान, आकुर्डी आणि औंध या दोन ठिकाणी कार्यालय आहे. परिणामी, वेगवेगळया तालुक्यांतून या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

एकाच वेळी कामे होत नसल्याने नागरिकांना नाईलाजाने तक्रारी कराव्या लागत आहेत. त्यातच अतिक्रमण झाल्याबाबत, दस्त अथवा कागदपत्रे न मिळण्याबाबत, बांधकाम परवानगी की अथवा मंजुरी विलंब होण्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. मात्र, या तक्रारी तातडीने संबंधित विभागाला पाठवून त्याचे निरसन करत असल्याची माहिती प्रशासन विभागाने दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT