Vegetables Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Vegetable Market Rates: पिंपरी भाजी मंडईत दरात चढ-उतार

दोडका-वांगी स्वस्त; लिंबू-मिरची महाग, उन्हाळ्यामुळे कलिंगड-खरबूजाला मागणी वाढली

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी येथील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत रविवार (दि. 8) रोजी बाजारात फळभाज्यांचे दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत कमी झाले होते. दोडका, वांगी स्वस्त तर लिंबू आणि मिरचीचे दर वाढले आहेत. उन्हामुळे पालेभाज्यांचे दर वाढले आहेत. वाटाणा, गाजर यांचे दर नेहमीप्रमाणे 30 ते 40 रूपये होते. बाजारात गवारीची आवक कमी आहे. बाजारात पालेभाज्यांचे दर कोथिंबीर, मेथी, शेपू, पालक यांचे दर 20 रूपये प्रति जुडी होते. कांदे 100 रूपये 5 किलो होते. लसूण 100 - 180 रूपये तर आले 60 - 80 रूपये किलो दराने उपलब्ध होते.

फळभाज्यांचे दर पुढीलप्रमाणे

रविवारी बाजारात गवार 120 रूपये किलो, शेवगा 90 रुपये किलो होता. वाटाणा 30 रूपये किलो, टोमॅटो 25 रूपये, भेंडी 60 रूपये किलो, फ्लॉवर 30 रूपये, कोबी 30 रूपये, मिरची 80 - 100 रूपये, गाजर 30 रूपये, शिमला 60 रूपये, लसूण 100 - 150 रूपये, आले 60 रूपये, वांगी 50 रूपये, काकडी 30 रूपये, कारले 50, कांदे 20 - 25 किलो, बटाटा 25- 30 रूपये किलो, बिन्स 60 रूपये किलो, पावटा 60, लाल भोपळा 30 रूपये, घोसाळी 60, दोडका 70 रूपये, तोंडली 50 रूपये, बीट 30 रूपये, दुधी 50, घेवडा 60.

पिंपरी बाजारातील दर पाले भाज्यांचे दर (रु.) प्रति जुडी

कोथिंबीर 20 रूपये, मेथी 20 रूपये, पालक 20 रूपये, शेपू 20 रूपये, राजगिरा 10, पुदिना 10 रूपये, मुळा 20 रूपये, चवळई 20, लाल माठ 15, कांदापात 20 रूपये, करडई 20, आळू पाने 10 रूपये जुडी, आंबट चुका 20 रूपये, गवती चहा 10,

फळभाज्यांचे : किलोचे भाव (किरकोळ रु.)

शेवगा 100 रूपये, गवार 160 रूपये, पावटा 80, तोंडली 60 रूपये, वाटाणा 40 रूपये, बीट 30, दोडका 80, कारली 60, भरताची वांगी 50, भेंडी 80 रूपये, मिरची 80 - 100, फ्लॉवर 30 - 40, कोबी 30, वांगी 60, घोसळे 70, पडवळ 90, दुधी भोपळा 50, पापडी 70, परवल 80, सुरण 80 रूपये, मद्रास काकडी 40 रूपये, आरबी 50 रूपये किलो, सिमला 60 रूपये, राजमा 50 काळा, राजमा लाल 50, बिन्स 70 रूपये, गाजर 40 रूपये किलो, आवळा 60 - 70, रताळी 80 रूपये, टोमॅटो 30 रूपये, बिन्स 60 रूपये, काकडी 30 रूपये किलो.

मोशी उपबाजारातील घाऊक दर (प्रतिकिलो रु.)

कांदा 8, बटाटा 10, लसूण 70, आले 35, भेंडी 30, गवार 75, टोमॅटो 9, वाटाणा 30, घेवडा 35, दोडका 35, हिरवी मिरची 60, दुधी भोपळा 25, काकडी 15, कारली 30, गाजर 25, फ्लॉवर 10, कोबी 10, वांगी 25, बीट 30, शेवगा 75, घोसाळी 30, लिंबू 110, शिमला 35, परवल 0, मका कणीस 15 रू प्रतिकिलो दर होते.

मोशी उपबाजारातील दर, आवक (क्विंटल)

फळभाजी 4648, पालेभाजी 72100 (गड्डी), फळे आवक 1852, कांदा 785, बटाटा 1108, आले 94, लसूण 27, भेंडी 121, गवार 11, टोमॅटो 609, वाटाणा 101, घेवडा 56, दोडका 47, हिरवी मिरची 171, दुधी भोपळा 73, काकडी 370, कारली 36, डांगर 72, गाजर 128, फ्लॉवर 356, कोबी 359, वांगी 211, ढोबळी 55, बीट 24, शेवगा 45, लिंबू 41, मका कणीस 53, तोंडली 2, रताळी 4 क्विंटल अशी आवक झाली.

कलिंगड, खरबूज, पपईला मागणी

पिंपरी : उन्हाळा आणि रोजे सुरु असल्याने रसदार कलिंगड, खरबूजांना आणि पपईला मागणी वाढली आहे. त्यामुळे पिंपरी फळ बाजारात कलिंगड, खरबूजांची, पपई, द्राक्षांची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. तसेच उन्हाळ्यामध्ये संत्री आणि मोसंबीला देखील मागणी वाढली आहे. डाळिंब देखील 250 रूपये किलो दराने उपलब्ध आहेत. वाढत्या उन्हामुळे रसदार कलिंगड आणि खरबुज खाण्याकडे ग््रााहकांचा कल आहे.

फळांचे दर प्रतिकिलो पुढीलप्रमाणे

सफरचंद 150 - 200 रूपये, मोसंबी 150, संत्री 200, डाळिंब 200 - 250, पेरू 100 रूपये, अंजीर 100 रूपये , पपई 50 - 60 रूपये, दाक्षे 160 रूपये, कलिंगड 40 रूपये, केळी 50 - 60 रूपये, खरबूज 60 रूपये, अननस 120 प्रतिनग, पिअर 260 रूपये, ड्रॅगनफुट पांढरे 300 रूपये, लाल ड्रॅगनफुट 400 रूपये, स्ट्रॉबेरी 100 रूपये, किवी 120 - 130,चिकू 80 - 100 रूपये.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT