भोसरी विधानसभा मतदार संघाचा अहवाल सादर करताना कुतूबुद्दीन होबळे पुढारी
पिंपरी चिंचवड

पिंपरी : एमआयएम अध्यक्षांकडे अहवाल सादर

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी : इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाच्या आढावा बैठकीत पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहर सचिव कुतूबुद्दीन होबळे यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांच्याकडे भोसरी विधानसभा मतदार संघाचा अहवाल सादर केला. त्या मतदार संघाबाबत सविस्तर माहिती त्यांनी त्यांच्यासमोर मांडली.

यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील, प्रदेश महासचिव अकील मुजावर व पदाधिकारी उपस्थित होते. कुतूबुद्दीन होबळे यांनी भोसरी मतदार संघातील पक्षाची ताकद, मतदार संख्या, पक्ष संघटन आदींची माहिती दिली. प्रभागनिहाय पदाधिकार्यांचा अहवाल देण्यात आला. अकील मुजावर आणि होबळे हे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आहेत. आरटीईच्या माध्यमातून विद्यार्थ्याना शिक्षणाचा हक्क मिळावा म्हणून विविध आंदोलन केली असल्याची माहिती दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT