पिंपरी: पिंपरी फळ बाजारात आंब्याच्या तुलनेत आता रानमेवा भाव खात आहे. आंबा 200-250 रुपये किलो तर जांभूळ 300 ते 400 रुपये आणि करवंदे 200 ते 250 रुपये किलो दराने विक्री केली जात आहे.
लांबट आणि गोल आकाराची जांभूळ करवंद ही चवीला आंबट-गोड व रसरशीत असतात. पण यावर्षी हंगामाच्या सुरुवातीस आवक कमी असल्याने दरही चढेच आहेत. एक किलोसाठी चारशे रुपये मोजावे लागत आहेत.
सध्या जांभूळ व करवंद या फळाची बाजारात आवक सुरू झाली आहे. मात्र, पाऊस वाढेल, तसतशी या फळाची आवक जास्त प्रमाणात बाजारात वाढेल आणि दरही सर्वसामान्यांच्या आवाक्यात येईल, असे विक्रेत्यांनी सांगितले.
करवंद ही डोंगराळ भागात जास्त प्रमाणात येत असतात. त्यामुळे यांचे दरही जास्त असतात. बाजारात आंबा देखील मोठ्या प्रमाणात विक्रीस आहे. आंब्याचे दर देखील कमी झाले आहेत. हापूस 250-300 रुपये किलो दराने उपलब्ध आहे. तर बदाम आंबा 100-150 रुपये किलो, लालबाग 150-2 00 रुपये किलो, कर्नाटक हापूस 200 रुपये किलो असा दर आहे.
फळांचे दर प्रतिकिलो पुढीलप्रमाणे सफरचंद 200 - 250 रुपयेे, मोसंबी 100, संत्री 160, डाळिंब 200 - 250, पेरू 120रुपये, अंजीर 200 - 250रुपयेे, पपई 60 रुपये, द्राक्षे 400, कलिंगड 20 - 25 रुपये, आंबा बदाम 150, लालबाग 200, कर्नाटक हापूस 200, केळी 40 - 50 रुपये डझन, खरबूज 60 रुपये, अननस 60 - 100 प्रतिनग, पिअर 200 रुपये, ड्रॅगनफ्रुट 150 - 200 रुपये, किवी 120, चिकू 50 - 100 रुपये, जांभुळ 300 - 400 रुपये, करवंद 250 रुपये किलो दराने विक्री केली जात आहे.