पिंपरी: पिंपरी येथील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत रविवार (दि. ४) पितृपंधरावड्यामुळे मेथी, कोथिंबीर, भेंडी, गवार यांना मागणी असल्याने दरात वाढ झाली आहे. तर फ्लॉवर व कोबीची आवक मंदावल्याने किलोचा दर ७० ते ८० रुपये झाला आहे. लसूण, आल्याचे आणि कांद्याचे दर तेजीतच आहेत. लिंबाची आवक कमी झाल्याने लिंबू २०० रुपये किलो दराने विक्री केली जात आहे. आले १०० ते १५० रुपये किलो दराने विक्री केली जात आहे.
कांदे ५० - ६० रुपये, लसूण १८० - २०० रुपये किलो दराने विक्री होत आहे, तर दुधी भोपळा २५ रुपये, टोमॅटो ३० रुपये किलो दर आहे. मेथी २५ - ३० रुपये जुडी विक्री केली जात आहे. गाजर ५० रुपये, बीट ५० रूपये, वाटाणा १०० - १५० रूपये, बीन्स ७० रुपये, राजमा ८० रूपये, वांगी ६० रुपये, गवार १०० - १५० रुपये, शेवगा ७० - ८० रुपये, दोडका ६० रुपये, फ्लॉवर ८० रुपये, कोबी ५० - ६० रुपये, काकडी ५० रुपये, टोमॅटो ३० रुपये, शिमला ७० रुपये, मिरची ५० रुपये, लसूण १८० - २०० रुपये, आले १५० - १८० रुपये, तोंडली ७० रुपये, बटाटा २५ ते ३० रुपये असे दर आहेत.
फळभाज्यांचे दर पुढील प्रमाणे
रविवारी बाजारात गवार ८०-१०० रुपये किलो, गावरान गवार २०० रूपये किलो, शेवगा ९० रुपये किलो होता. वाटाणा १०० - १५० रुपये, टोमॅटो ३० रुपये, भेंडी ८० रुपये किलो, फ्लॉवर ७० रुपये, कोबी ५० रुपये, मिरची ६० रुपये, गाजर ५० रुपये, शिमला ७० रुपये, लसूण १८०-२०० रुपये, आले १५० रुपये, वांगी ६० रुपये, काकडी ४० रुपये, कारले ७०, कांदे ५० - ६० किलो, बटाटा २५ - ३० रुपये किलो, बिन्स ७० रुपये किलो, पावटा ८०, लाल भोपळा ४० - ५० रुपये, घोसाळी ४०, दोडका ५० - ६० रुपये, तोंडली ७० रुपये, बीट ५० रुपये, दुधी २५, घेवडा ५० - ६० रुपये किलो दराने विक्री केली जात आहे.
पिंपरी बाजारातील दर पाले भाज्यांचे दर (रु.) प्रतिजुडी
कोथिंबीर २५ - ३० रुपये, मेथी २५ - ३०, पालक २०, शेपू २०, राजगिरा १५, पुदिना १५, मुळा १५, चवळई १५, लाल माठ १५, हिरवा माठ १५, करडई १५, कांदापात १५, करडई १५, आळू पाने २० रुपये जुडी, आंबट चुका २० रुपये, लाल देठ ३० - ४० रुपये जुडी.
फळभाज्यांचे : किलोचे भाव (किरकोळ रु.)
शेवगा १०० रुपये, गावरान गवार २०० रुपये किलो, गवार १०० रुपये, पावटा ७०, तोंडली ७० रुपये, बीट ५० , दोडका ७०, कारली ८०, भरताची वांगी ५०, भेंडी ८० रुपये, मिरची ६०, फ्लॉवर ८०, कोबी ६०, वांगी ७०, घोसाळे ५०, पडवळ ५०, दुधी भोपळा ३० - ३५ , पापडी ९०, पावटा ८०, परवल ८०, सुरण ९० रुपये, मद्रास काकडी ५० रुपये, आरबी 80 रुपये किलो, सिमला ८० रुपये, राजमा ८०, बिन्स ८०, गाजर ५० रुपये किलो, आरवी ८०, रताळी ७० रुपये, टोमॅटो ३० रुपये प्रतिकिलो दराने विक्री केली जात आहे.
मोशी उपबाजारातील घाऊक दर (प्रतिकिलो रु.)
कांदा ४०, बटाटा १५, लसूण ११०, आले ७५ , भेंडी ५०, गवार ८०, टोमॅटो २०, वाटाणा ९०, घेवडा ४५, दोडका ४५, हिरवी मिरची ५०, दुधी भोपळा २५, काकडी २५, कारली ५०, गाजर ३०, फ्लॉवर ३५, कोबी २५, ढोबळी ४०, वांगी ४०, शेवगा ७५, घोसाळी ३०, लिंबू १००, मका कणीस ८० रुपये प्रतिकिलो दर होते.
मोशी उपबाजारातील दर, आवक (क्विंटल)
फळभाजी ५१८२, पालेभाजी ५१८०० (गड्डी), फळे आवक ६०३, कांदा ५८५, बटाटा १६०६, लसूण १०, आले ३३, भेंडी १२४, गवार १४, टोमॅटो ६७७, वाटाणा ५४, घेवडा ३२, दोडका ३३, हिरवी मिरची १०८, दुधी भोपळा ७०, काकडी ३६५, कारली २८, डांगर ९६, गाजर १६८, फ्लॉवर ३४५, कोबी ३९२, वांगी १५२, ढोबळी ९८, बीट २०, शेवगा २९, लिंबू ३६, मका कणीस ७०, तोंडली ४, रताळी १० क्विंटल इतकी आवक झाली आहे.