Pimpri Latest Market Update
पिंपरी: पिंपरी येथील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत रविवारी (दि. 27) जुलै रोजी गेल्या आठवड्याच्या तुलनेत फळभाज्या आणि पालेभाज्यांचे दर ग्राहकांच्या आवाक्यात आले आहेत. एरवी श्रावण महिन्यात भाज्यांचे दर वाढलेले असतात; मात्र मोठ्या प्रमाणात वाढल्याने भाज्यांचे दर कमी झाले आहेत. तसेच पालेभाज्या देखील स्वस्त झाल्या आहेत. इतके दिवस स्वस्त असणारे टोमॅटोचे दर 50 रुपये प्रतिकिलो झाले.
कांदे आणि बटाटे यांचे भाव मात्र स्थिर आहेत. शंभर रुपयांना पाच किलो कांदे व बटाटे विक्री केले जात आहेत. पावसामुळे टोमॅटोचे नुकसान झाल्याने टोमॅटोचे दर वाढले आहेत. कोथिंबीरची जुडी आठ ते दहा रुपये तर पालेभाज्या 20 रुपये जुडी विक्री केली जात होती. हिरवी मिरची 100 रुपये किलो दराने विक्री केली जात आहे. फळभाज्यांमध्ये वांगी, दोडका, फ्लॉवर 80 रुपये किलो प्रतिकिलोचा दर आहे. (Latest Pimpri News)
फळभाज्यांचे दर पुढीलप्रमाणे : गवार 80 - 100 रुपये किलो, शेवगा 50 - 60 रुपये प्रति किलो दराने विक्री केला जात आहे. वाटाणा 100 रुपये किलो, टोमॅटो 50 रुपये, भेंडी 50 रुपये किलो, फ्लॉवर 40 रुपये, कोबी 30 रुपये, मिरची 100 रुपये, गाजर 40 रुपये, शिमला 50 - 60 रुपये, लसूण 80 - 100 रुपये, आले 60 रुपये, वांगी 40 रुपये, काकडी 30 रुपये, कारले 50 - 60 , कांदे 100 रुपये 5 किलो, बटाटा 25 रुपये किलो, बिन्स 40 - 50 रुपये किलो, पावटा 50 - 60, रताळी 60 रुपये, लाल भोपळा 60 रुपये, घोसाळी 50, दोडका 40 - 50 रुपये, तोंडली 50 रुपये, बीट 40 रुपये, दुधी 50, घेवडा 50 - 60 असे दर आहेत.
पिंपरी बाजारातील दर
पालेभाज्यांचे दर (रु.) प्रतिजुडी
कोथिंबीर 8 - 10 रुपये, मेथी 15 रुपये, पालक 15 - 20 रुपये, शेपू 10 रुपये, पुदिना 10 रुपये, मुळा 20 रुपये, चवळई 20, लाल माठ 20, कांदापात 20 रुपये, करडई 20, आळू पाने 60 रुपये जुडी.
फळभाज्यांचे : किलोचे भाव (किरकोळ रु.)
बीट 80, वाल 60, दोडका 50, कारली 50, भरताची वांगी 50, गवार 80, शेवगा 50, भेंडी 50 ,मिरची 100, फ्लॉवर 50, कोबी 40, वांगी 50, तोंडली 50, घोसळे 50, पडवळ 50, भोपळा 50, पापडी 50 - 60, बीन्स 60 - 70 रुपये, परवल 50, रताळी 60 रुपये किलो, सुरण 50 रुपये, मद्रास काकडी 60 रुपये, आरबी 70 रुपये किलो, सिमला 40 रुपये, वाटाणा 100 - 120 रुपये, राजमा 70 काळा, राजमा लाल 70
मोशी उपबाजारातील घाऊक दर (प्रतिकिलो रु.)
कांदा 11, बटाटा 12, आले 40, भेंडी 25, गवार 50 , टोमॅटो 30, वाटाणा 80, घेवडा 50, दोडका 25, हिरवी मिरची 50, दुधी भोपळा 20, काकडी 25, कारली 35, गाजर 25, फ्लॉवर 30, कोबी 25, वांगी 30, ढोबळी 35, शेवगा 55, घोसाळी 30, पावटा 65, मिरची 50 प्रतिकिलो दर होते.
फुलांचे भाव वधारले
व्रतवैकल्याचा श्रावण महिना सुरू झाल्याने फुलांची आवक वाढली आहे; मात्र मागणी वाढल्याने फुलबाजारात तेजी असून, दरही वाढले आहेत. श्रावण महिन्यामध्ये पूजा, अनेक धार्मिक कार्यक्रम सुरू असतात. त्यामुळे केळीचे खुंट बाजारात उपलब्ध आहेत. विड्याची पाने, तुळशीची पाने, धोत्र्याचे फूल, बेलफळाची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. श्रावणातील सोमवारला विशेष महत्त्व असल्याने महिला आणि पुरुष पूर्वसंध्येलाच पूजेचे साहित्य खरेदी करीत होते. रविवारी फुलबाजारात झेंडूची फुले 100 रुपये किलो दराने उपलब्ध होती. शेवंती, बिजली, अॅष्टर, गुलाबाची फुले 200 ते 250 रुपये किलोने विक्री केली जात होती. लाल रंगाच्या कमळाचे फूल 25 रुपये प्रतिनग विक्री केली जात होती.