लक्ष्मीपूजनदिवशी पिंपरीत आगीच्या 26 घटना Pudhari
पिंपरी चिंचवड

Diwali Fire Incidents: लक्ष्मीपूजनदिवशी पिंपरीत आगीच्या 26 घटना; अग्निशामक दलाची रात्रीभर धावपळ

दिवाळीत आतषबाजी आणि इतर कारणांमुळे 70 ठिकाणी लागल्या आगी; सुदैवाने जीवितहानी टळली

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: दिवाळी सणातील आतषबाजीमुळे तसेच इतर कारणांनी आग लागण्याच्या 70 घटना घडल्या. यात सर्वाधिक घटना या 21 ऑक्टोबर म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घडल्या. रात्रीपासून पहाटेपर्यंत आलेल्या कॉलमुळे अग्निशामक दलाच्या जवानांची धावपळ सुरूच होती. दरम्यान, किरकोळ स्वरुपाच्या आगीची नोंद झाल्या असून, कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे अग्निशामक दलाने सांगितले. (Latest Pimpri chinchwad News)

शहरात सज्जतेचा भाग म्हणून अग्निशामक विभागाने 19 अग्निशमन वाहने संवेदनशील भागांमध्ये तैनात केली होती. त्यात बाजारपेठा, फटाक्यांची दुकाने आणि लोकवस्तीमध्ये ही वाहने उभी करण्यात आली होती. तसेच सर्व उपकेंद्रांमध्येही तत्परतेने दल कार्यरत ठेवले होते. आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात आले व मोठ्या प्रमाणात वित्तहानी टळली.

दरम्यान, दिवाळीच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 17 ऑक्टोबरला आगीचा पहिला कॉल मोरवाडी येथील आयटीआय शेजारी असलेल्या ठिकाणांहून आला. त्यानंतर त्याच दिवशी वेगवेगळया ठिकाणी 3 कॉल आले. दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी अवघे दोनच कॉल आले होते. त्यानंतर 19 ऑक्टोबरला 7 आगीच्या घटना घडल्या. तर, सर्वाधिक घटना या 20 आणि 21 ऑक्टोबरला घडल्या आहेत. यामध्ये मोरवाडी, चिखली, प्राधिकरण, थेरगाव, मोशी, रहाटणी, पुनावळे, पिंपरी बाजार, बिजलीनगर, काळभोरनगर, एचए मैदान अशा विविध ठिकाणी कॉल प्राप्त झाले होते.

काही ठिकाणी उंच इमारतींमध्ये आग लागल्याच्या घटना घडल्या. एम्पायर स्क्वेअर इमारतीच्या 17व्या मजल्यावर व वाकड येथील एका सोसायटीच्या 8व्या मजल्यावर लागलेल्या आगीवर दलाने शर्थीचे प्रयत्न करत नियंत्रण मिळवले. या सर्व घटनांमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही दिलासादायक बाब आहे.

बाजारपेठेत तीन घटना

पिंपरी बाजारपेठेत दिवाळीचा संपूर्ण आठवडा गर्दीचा ठरला. दरम्यान, पिंपरी बाजारापेठेत दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. मात्र, स्थानिक नागरिक व अग्निशमन दलाने वेळेवर आगीवर नियंत्रण मिळवले. त्यात दुर्गा माता मंदिर, साई चौक कराची हॉटेल आणि शगुन चौक या ठिकाणी आगीच्या घटना घडल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT