Election Voting Pudhari
पिंपरी चिंचवड

Voter Registration: १८ वर्षे पूर्ण झालीत? मतदार यादीत नाव नसेल तर लगेच करा नोंदणी; पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोहीम

अठरा वर्षे पूर्ण झालेल्या तरुणांची 12 ऑक्टोबरपर्यंत मतदार नोंदणी मोहीम

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात मतदार नोंदणी व जनजागृती विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

या मोहिमेत वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या पात्र तरुण व तरुणींची नवीन मतदार म्हणून नोंदणी करावी, विद्यमान मतदारांनी आपल्या मतदार ओळखपत्रातील नाव, पत्ता, वय किंवा अन्य तपशिलांमध्ये काही त्रुटी असल्यास त्या दुरुस्त करून घ्याव्यात, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकार्‍यांनी केले आहे.

शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील पात्र नागरिकांनी मतदार यादीमध्ये आपले नाव नोंदविण्यासाठी तसेच, मतदार यादीतील तपशील अद्ययावत करण्यासाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मोहिमेचा लाभ घ्यावा. यासाठी महापालिकेच्या वतीने जनजागृती करण्यात येणार आहे.

विशेषतः तरुण व प्रथमच मतदानाचा हक्क प्राप्त करणार्‍या युवा पिढीपर्यंत ही माहिती पोहोचविली जाणार आहे. शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये शिबिरोच आयोजन करुन मतदार नोंदणी केली जाणार आहे.

लोकशाही प्रक्रियेत मतदानाचा हक्क महत्त्वाचा असून, 18 वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक पात्र नागरिकाने मतदार म्हणून आपली नोंदणी करून घ्यावी. यादीत नाव असलेल्या मतदारांनी मतदार यादीतील आपले नाव व इतर तपशील अचूक असल्याची खात्री करावी.

मतदार नोंदणी व मतदार यादीतील तपशील दुरुस्तीची प्रक्रिया सुरू आहे. पात्र नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होऊन आपली मतदार नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन पिंपरी विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी अर्चना यादव, चिंचवड विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी संदीप खोत आणि भोसरी विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी सचिन पाटील यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT