Voter Verification Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad SIR Voter Verification: पिंपरी-चिंचवडमध्ये ६ लाख ८ हजार मतदार गायब; मतदारसंख्येत मोठी घट

एसआयआर पडताळणीत स्थलांतरित, मयत, दुबार व गैरहजर मतदार आढळले; भोसरी ठरला सर्वाधिक मतदारसंख्येचा मतदारसंघ

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण 17 लाख 24 हजार 537 मतदार आहेत. मतदार पडताळणी मोहिमेत (एसआयआर) तब्बल सहा लाख 8 हजार 148 मतदार गायब झाले आहेत. निवडणूक विभागाकडून ती नावे स्थलांतरीत, मयत व दुबार असल्याचे सांगितले जात असले तरी, ती नावे बोगस असल्याचे स्पष्ट होत आहे. ती नावे वगळण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

शहरात पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघ असे तीन मतदार संघ आहेत. पिंपरीत एकूण 4 लाख 1 हजार 975 मतदार आहेत. चिंचवडमध्ये सर्वांधिक 6 लाख 87 हजार 448 मतदार आहेत. तर, भोसरीत 6 लाख 35 हजार 114 मतदार आहेत. असे एकूण 17 लाख 24 हजार 537 मतदार शहरात आहेत. मतदार पडताळणी मोहिम सोमवारी (दि.17) संपली आहे.

त्या कालावधीत शहरातील तब्बल 6 लाख 8 हजार 148 मतदार बीएलओ यांना सापडले नाहीत. चिंचवडमधील सर्वाधिक 2 लाख 70 हजार 97 मतदार गायब आहेत. भोसरीतील 1 लाख 72 हजार 237 आणि पिंपरीतील 1 लाख 65 हजार 814 मतदार सापडले नाहीत. त्या मतदारांनी स्थलांतर केले आहे. काही मतदारांचा मृत्यू झाला आहे. तर, काहींची दुबार नावे आहेत, असे निवडणूक अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, त्यातील सर्वाधिक नावे ही बोगस असल्याचे स्पष्ट होत आहे.

आढळून न आलेल्या मतदारांची नावे यादीतून वगळ्यात येणार आहे. त्यासाठी सुनावणी घेतली जाणार आहे. त्यानंतर ती सर्व नावे कायमस्वरूपी बाद केली जाणार आहेत. त्यामुळे शहराची मतदार संख्या घटून 11 लाख 16 हजार 389 वर आली आहे.

आता चिंचवडऐवजी भोसरी मतदारसंघ मोठा:

ताज्या आकडेवारीवरून पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वाधिक मतदारसंख्या असलेला चिंचवडऐवजी भोसरी मतदारसंघ मोठा ठरला आहे. त्या संघात एकूण 4 लाख 62 हजार 877 मतदार आहेत. तर, चिंचवडमध्ये 4 लाख 17 हजार 351 आणि पिंपरीत 2 लाख 36 हजार 161 मतदार आहेत. त्यांची नावे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत.

पिंपरी विधानसभा मतदारसंघ

  • एकूण मतदार : 4 लाख 1 हजार 975

  • डिजिटलायजेशन : 2 लाख 36 हजार 161 (58.75 टक्के)

  • आढळून आलेले स्थलांतरित, गैरहजर, मयत, दुबार मतदार (संख्या आणि टक्केवारी) : 1 लाख 65 हजार 814 (41.25 टक्के)

  • सापडू न शकलेले / गैरहजर - 1 लाख 12 हजार 765 (28.05 टक्के)

  • कायमस्वरूपी स्थलांतरित - 26 हजार 774 (6.66 टक्के)

  • मयत - 18 हजार 820 (4.68 टक्के)

  • दुबार मतदार - 6 हजार 981 (1.74 टक्के)

  • इतर - 474 (0.12 टक्के)

चिंचवड विधानसभा मतदारसंघ

  • एकूण मतदार : 6 लाख 87 हजार 448

  • डिजिटलायजेशन : 4 लाख 17 हजार 351 (60.71 टक्के)

  • आढळून आलेले स्थलांतरित, गैरहजर, मयत, दुबार मतदार (संख्या आणि टक्केवारी) : 2 लाख 70 हजार 97 (39.29 टक्के)

  • सापडू न शकलेले / गैरहजर - 2 लाख 20 हजार 550 (32.08 टक्के)

  • कायमस्वरूपी स्थलांतरित - 18 हजार 124 (2.64 टक्के)

  • मयत - 17 हजार 103 (2.49 टक्के)

  • दुबार मतदार - 14 हजार 135 (2.06 टक्के)

  • इतर - 185 (0.03 टक्के)

भोसरी विधानसभा मतदारसंघ

  • एकूण मतदार : 6 लाख 35 हजार 114

  • डिजिटलायजेशन : 4 लाख 62 हजार 877 (72.88 टक्के)

  • आढळून आलेले स्थलांतरित, गैरहजर, मयत, दुबार मतदार (संख्या आणि टक्केवारी) : 1 लाख 72 हजार 237 (27.12 टक्के)

  • सापडू न शकलेले / गैरहजर - 1 लाख 16 हजार 447 (18.33 टक्के)

  • कायमस्वरूपी स्थलांतरित - 24 हजार 16 (3.78 टक्के)

  • मयत - 14 हजार 372 (2.26 टक्के)

  • दुबार मतदार - 13 हजार 57 (2.06 टक्के)

  • इतर - 4 हजार 345 (0.68 टक्के)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT