Pimpri Chinchwad Municipal Election 2026 Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Municipal Election: माजी महापौरांच्या पतीविरोधात गुन्हा, पाच पोलीस निलंबित, कारण काय?

Pimpri Chinchwad Voting: मतदारांनी घरा बाहेर पडून मतदान करावे असे आवाहन आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी केले.

पुढारी डिजिटल टीम

Pimpri Chinchwad Municipal Election Voting 2026

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान पार पडत असतानाच दुसरीकडे भाजपच्या उमेदवार अपर्णा डोके यांच्या पतिविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहे. तर निवडणूक काळात गैरहजर राहिल्याने पाच अंमलदार तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.

माजी महापौरांच्या पतीविरुद्ध गुन्हा का दाखल करण्यात आला?

भाजपच्या उमेदवार व माजी महापौर अपर्णा डोके यांच्या पतीविरुध्द मतदान केंद्रावर मोबाईल नेल्यामुळे व मतदान करताना फोटो टाकल्यामुळे FIR दाखल करण्याचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले.

मोबाईल जमा करण्यासाठी मतदारांची गर्दी

मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास मनाई आहे. पिंपरी- चिंचवडमधील काही मतदान केंद्रामध्ये मोबाईल जमा करण्यासाठी टेबल आहे. मात्र, तिथे गर्दी होत असल्याने ही जागा केंद्राच्या गेटच्या आतमधून बाहेर हलवण्यात आली.

पाच पोलीस निलंबित, कारण काय?

निवडणूक काळात गैरहजर राहिल्याने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील पाच अंमलदारांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी ही कारवाई केली.

सकाळी 11.30 वाजेपर्यंत किती टक्के मतदान?

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत साडेआकरा वाजेपर्यंत 16.03 टक्के मतदान झाले. मतदान प्रक्रिया शांत तापूर्ण, पारदर्शक वातावरणात पार पडावी यासाठी शहरातील सर्व मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे वेब कास्टिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महापालिकेच्या वॉर रूमच्या माध्यमातून प्रत्येक मतदान केंद्रावर सातत्याने देखरेख ठेवण्यात येत असून कायदा व सुव्यवस्थेला प्राधान्य देण्यात आले आहे. तर मतदारांनी घरा बाहेर पडून मतदान करावे असे आवाहन आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी केले.

महिला उमेदवाराच्या पतीचा आरओच्या कारमधून प्रवास

कल्पतरू सोसायटीच्या मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाला. महिला उमेदवाराचे पती राहुल जवळकर हे थेट आरओच्या गाडीसमोर बसले, यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. मतदार याद्यांमध्ये घोळ आहे आणि बोगस मतदान होतंय, असा आरोप यावेळी करण्यात आलाय. निवडणूक आयोग आणि पोलीस बळाचा वापर करतायेत असा आरोप विरोधकांनी केला.

कुठे मशीन बंद, तर कुठे मतदार यादीत नावच नाही

प्रभाग क्रमांक 13 मधील मतदान केंद्र क्रमांक 49 मधील मतदान प्रक्रिया तब्बल पाऊण तास बंद पडली होती. मशीनवरील काही बटन प्रेस होत नसल्याने मतदान प्रक्रिया काही वेळ थांबवण्यात आली होती. तर बऱ्याच केंद्राबाहेर मतदार यादीत नाव शोधताना मतदारांची दमछाक होत होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT