Pimpri Chinchwad Municipal Corporation Pudhari
पिंपरी चिंचवड

Industrial Facilitation Cell: पिंपरी-चिंचवड महापालिकेचा औद्योगिक सुविधा कक्ष थंडावला

तीन महिन्यांत एकही तक्रार नाही; उद्योजक व प्रशासनाच्या बैठकीही रखडल्या

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: औद्योगिक आणि आर्थिक गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र असा औद्योगिक सुविधा कक्ष स्थापन केला होता. व्यवसाय सुलभता संकल्पनेच्या आधारित हा कक्ष सुरू करण्यात आला होता. साधारण वर्षभरानंतर या कक्षाचा प्रतिसाद थंडावला आहे.

गेल्या तीन महिन्यांत म्हणजेच डिसेंबरपासून या कक्षाकडे उद्योजकांच्या तक्रारी आल्या नाहीत. विशेष म्हणजे, उद्योजकांची व अधिकाऱ्यांची बैठक देखील झालेली नाही. त्यामुळे हा कक्ष केवळ नावापुरताच आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

औद्योगिकनगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहारातील औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी हा कक्ष स्थानिक उद्योग व प्रशासन यांच्यात समन्वय साधून अनुकूल वातावरण करणे हा मुख्य हेतू होता. महापालिकेच्या विविध विभागाशी समन्वय साधून औद्योगिक अडचणी सोडविण्यात येणार होते. दरम्यान, हा कक्ष महापालिका व स्थानिक उद्योगांमध्ये संवाद प्रस्तापित करणे, उद्योगांच्या समस्यांचे निराकरण करणे आणि शहरातील औद्योगिक गुंतवणुकीस अनुकूल वातावरण करणे हा होता. दरम्यान, हा कक्ष सुरु झाल्यापासून आत्तापर्यंत जवळपास 54 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तसेच, अनेकांनी विविध विभागांशी तक्रारीबाबत माहिती देखील घेतली होती.

‌‘सीएसआर‌’साठी प्रयत्न अपुरे

औद्योगिक क्षेत्राच्या विकासात मदत करणाऱ्या सीएसआर प्रकल्पांसाठी समन्वय आणि मार्गदर्शन करण्यासाठी हा कक्ष काम करणार होता. शहरातील जवळपास 40 कंपन्यांशी संपर्क साधण्यात आला होता. त्यातील 4 ते 5 कंपन्यानी सकारात्मकता देखील दाखवली होती. त्याचा पाठपुरावा सुरु असल्याचे सीएसआर सेलचे मुख्य सल्लागार विजय वावरे यांनी सांगितले.

उद्योजकांच्या तक्रारी घटल्या

उद्योजकांकडून वेगवेगळया तक्रारी अथवा समन्वय साधण्यासाठी कक्ष सुरु होता. मात्र, गेल्या दोन ते तीन महिन्यात एकही तक्रार अथवा कोणतीच सूचना आली नाही. विशेष म्हणजे मासिक व त्रैमासिक बैठका घेण्यात येणार होत्या. त्या देखील झाल्या नसल्याचे दिसून येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT