पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. मतदानाची वेळ सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच अशी आहे. या वेळेत मतदान करावे, असे आवाहन महापालिकेच्या निवडणूक विभागाने केले आहे; मात्र, उमेदवारांच्या प्रचारात तसेच, माहितीपत्रकावर चुकीची वेळ नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे मतदारांमध्ये संभम निर्माण झाला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेची मतदानाची वेळी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच अशी आहे. या वेळेत प्रभागातील संबंधित केंद्रावर नाव आहे, त्या ठिकाणी मतदारांना मतदान करता येणार आहे. त्यासाठी निवडणुकीचे ओळखपत्र, आधारकार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना व इतर शासकीय ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
काही उमेदवारांच्या प्रचारात मतदाराची वेळ चुकीची सांगण्यात येत आहेत. तसेच, माहितीपत्रकावर चुकीची वेळी नमूद करण्यात आली आहे. मतदारांनी निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळेत मतदान करून लोकशाहीचा हक्क बजावावा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.