Dengue Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Degue Malaria Cases: सप्टेंबरमध्ये डेंग्यूचे ७० तर मलेरियाचेही ८ रुग्ण पॉझिटिव्ह

पिंपरी-चिंचवाडमध्ये सप्टेंबरमध्ये डेंग्यूचे ७० आणि मलेरियाचे ८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले; १,५९३ संशयित तापाच्या रुग्णांचे नमुने तपासले.

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: शहरात गेल्या काही दिवसांपासून कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या अहवालानुसार, सप्टेंबर महिन्यात शहरात डेंग्यूचे ७० तर मलेरियाचे ८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यावरून पावसाळा संपल्यानंतरही कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याचे दिसत आहे.

महापालिकेच्या आकडेवारीनुसार, सप्टेंबरमध्ये शहरातील विविध खासगी आणि महापालिकेच्या रुग्णालयातून एकूण १५९३ संशयित तापाच्या रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी ७० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

दरम्यान, ४३ हजार ६७६ संशयित रुग्णांपैकी ८ जणांना मलेरियाची लागण झाली आहे. चिकुनगुनियाचे ४ संशयित आढळले आहेत. शहरातील भागात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू असून. तिथे पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती वाढली आहे.

या पार्श्वभूमीवर महापालिकेने प्रतिबंधात्मक उपाययोजना युद्धपातळीवर सुरू केल्या आहेत. शहरात ३०० हून अधिक आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन डासउत्पत्ती स्थाने शोधत आहेत.

वैद्यकीय विभागाने नागरिकांना घरात आणि परिसरात पाणी साचू देऊ नका, दर आठवड्याला कोरडा दिवस पाळा, असे आवाहन केले आहे. ताप आल्यास अंगावर काढू नका, तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या, असेही सांगण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT