Appointment Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Councillor Appointments: पिंपरी-चिंचवड महापालिकेत नगरसेवकांची नियुक्ती विलंबित; १५ एप्रिलला होऊ शकते मंजुरी

भाजपच्या अर्ज अपूर्ण असल्याने स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीवर तहकूब; जकात नाके आणि डीपी सुनावणी समितीवर निर्णयही पुढे ढकलला

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीचा विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. मात्र, भाजपच्या सात जणांचे अर्ज भरले नसल्याने भाजप नगरसेवकांनी आयुक्तांकडे मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. दरम्यान, मंजुरीसाठी ठेवण्यात आलेल्या यादीत राष्ट्रवादी काँग््रेासच्या राजेंद्र जगताप, सीमा साळवे, फजल शेख या तीन स्वीकृत नगरसेवकांचा नावाचा समावेश होता.

मात्र, नियुक्तीचा विषय तहकूब करण्यात आला आहे. आता या निवडी 15 एप्रिलच्या सर्वसाधारण सभेत होण्याची शक्यता आहे. विषय तहकूब केल्याने स्वीकृत नगरसेवकांचा महिनाभराचा कालावधी वाया गेल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच, डीपी सुनावणी समितीवर सदस्य म्हणून स्थायी समितीच्या तीन सदस्यांची निवड करण्याचा विषयही तहकूब करण्यात आला. त्या विषयावर सभागृहाने अनेक ठिकाणचे आरक्षणे रद्द करण्याची मागणी केली.

जकात नाक्याच्या जागेवरून आरोप-प्रत्यारोप

चऱ्होली येथील जकात नाक्याची 6 हजार 500 चौरस मीटर जागा ताब्यात घेण्याचा विषयावर चर्चा करताना सुलभा उबाळे यांनी जकात नाके बंद केले. मात्र, जागेचा विकासच केला नाही. ती जागा मालकाला परत द्यावी, अशी मागणी केली. संदीप वाघेरे यांनी खासगी जागा दिल्यानंतरही महापालिकेने विकास केला नाही.

टीडीआर दिला; पण प्रत्यक्ष काम शून्य, असा आरोप केला. प्रशांत शितोळे, नितीन काळजे, संजय काटे, तुषार हिंगे, वैशाली काळभोर आदींनीही संपूर्ण माहिती देण्याची मागणी केली. नगररचना विभागाने जागांची स्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी वैशाली काळभोर यांनी केली.

त्यावर नगर रचना विभागाचे उपसंचालक किशोर गोखले यांनी खुलासा करताना सांगितले, की 10,500 चौरस मीटर जागेचा संदर्भ देत तापकीर यांची सुमारे 6,500 चौरस मीटर जमीन असल्याचे सांगितले. दोन वर्षांत ताबा घेण्याची प्रक्रिया असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी उपसूचना देत शहरातील कलाकारांसाठी जागा द्यावी. नाट्य संकुलासाठी 30 ते 35 कोटींचा खर्च अपेक्षित आहे, अशी उपसूचना दिली. उपसूचनेसह महापौरांनी त्या विषयाला मंजुरी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT