Cloudy Sky Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Weather Update: पिंपरी-चिंचवडमध्ये ढगाळ वातावरणामुळे तापमानात वाढ

तापमान 30 अंशांपर्यंत; पुढील पाच ते सहा दिवस हवामान असेच राहण्याचा अंदाज

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात वाढ झाली असून, तापमान 30 अंशांपर्यंत पोहोचले आहे. पुढील पाच ते सहा दिवस ढगाळ वातावरण राहून तापमानात वाढ होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे.

दुपारी ऊन, ढगाळ वातावरण आणि थंडी अशा संमिश्र वातावरणाचा अनुभव सध्या नागरिकांना येत आहे. सकाळी धुकेदेखील पडत आहे. सध्या थंडी हळूहळू कमी होत असून, वातवरणातील बदलाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे.

दुपारी उन्हामध्ये बाहेर पडल्यावर थंड पेय पिणे, नंतर चहा, कॉफी यासारखे गरम पेय पिल्याने घसा खवखवणे, खोकला, सर्दी आदी आजारांमध्येही वाढ होत आहे. तसेच, ढगाळ वातावरणाने ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना सांधेदुखी, अंगदुखी आदींना सामोरे जावे लागत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT