तळेगाव स्टेशन; पुढारी वृत्तसेवा: आर्यन बेडेकरच्या खूनातील संशयित आरोपींची वराळे परिसर, सरस्वती विद्यामंदिर, तळेगाव स्टेशन भागात तळेगाव दाभाडे पोलिसांनी धिंड काढली.
आर्यन बेडेकर याचा शुक्रवारी (दि.३१) धारदार शस्राने निर्घृण खून करण्यात आला होता. खूनातील संशयित आरोपींना अटक केली असून ते गुन्ह्याच्या ठिकाणी कोणत्या मार्गाने आले, गुन्हा केल्यानंतर कोठे पळून गेले. तसेच सीसीटीव्ही फुटेज नुसार पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
दरम्यान, आरोपींना जरब बसावी, कायद्याचा धाक बसावा, गुन्हेगारी आटोक्यात यावी आणि नागरिकांमधील भीतीचे वातावरण निवळावे, या हेतूने संशयितांची धिंड काढण्यात आली, अशी माहिती तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशनच्या सूत्रांनी दिली.