Pimpri News Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri News: महापौर रवी लांडगे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी सायकलवरून महापालिका भवनात

आखाती देशातील युद्धामुळे इंधनाचे दर वाढविण्यात येत आहेत.

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: महापौर रवी लांडगे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि काही अधिकार्‍यांनी शुक्रवारी (दि.15) सायकलवर प्रवास केला. ते महापालिका भवनात सायकल आले. त्यातून त्यांनी वाहनांचा वापर कमी करण्याचा संदेश शहरवासीयांना दिला आहे.

आखाती देशातील युद्धामुळे इंधनाचे दर वाढविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट्रोने फिरा, परदेश प्रवास वर्षभर टाळा, सोने खरेदी करू नका, वर्क फ्रॉम होम करा, खासगी वाहन वापरू नका, खाद्यतेलाचा वापर कमी करा, असे सल्ले देशवासीयांना दिले आहेत. त्यांच्या सल्ल्यानंतर मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनी ताफ्यातील वाहने कमी केली आहेत. दुचाकीचा तसेच, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर सुरू केला आहे. काही मंत्र्यांनी परदेश दौरे रद्द केले आहेत.

महापालिकेचे महापौर रवी लांडगे यांचा अझरबैजान दौर्‍याही रद्द करण्यात आला आहे. त्यांनी आठवड्यातून एकदा सायकलने प्रवास करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार महापौर लांडगे, आयुक्त सूर्यवंशी, सहशहर अभियंता बापूसाहेब गायकवाड व कर्मचार्‍यांनी वाहनांचा वापर न करता, आज सायकलवरून महापालिका भवनात आले. इतर पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी तसेच, नागरिकांनी सायकल प्रवास करून इंधनाची बचत करावी. त्यातून आपले शरीर सदृढ करावे, असे आवाहन महापौर लांडगे व आयुक्त सूर्यवंशी यांनी शहरवासीयांना केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT