पिंपरी: शहरातील मालमत्ताधारकांनी 30 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन कर भरल्यास त्यांना सामान्य करावर 4 टक्के सूट मिळणार आहे. ज्यांनी अद्याप मालमत्ताकर भरला नाही, त्यांनी तात्काळ तो भरून या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
तीस जूनपर्यंत ऑनलईन कर भरणार्यांना 10 टक्के सवलत देण्यात आली. त्याचा लाभ 3 लाख 37 हजार मालतमत्ताधारकांनी घेतला. त्यात एकूण 522 कोटी रुपयांचा भरणा झाला आहे. 30 सप्टेंबरपर्यंत बिल ऑनलाइन भरल्यास 4 टक्के सवलतीचा लाभ घेता येणार आहे. (Latest Pimpri News)
थकबाकीदारांवर कारवाई करण्यास सुरुवात
महापालिकेच्या करआकारणी व करसंकलन विभागामार्फत थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांवर जप्तीची कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत 34 हजार 769 मालमत्ताधारकांना जप्तीपूर्वी नोटीस बजावण्यात आली आहे.
ज्या थकबाकीदारांना नोटीस देऊनही पहिल्या तिमाहीत कर भरण्याबाबत टाळाटाळ करण्यात आली आहे, अशा मालमत्तांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. लवकरात लवकर कर भरून कारवाई टाळावी, असे करसंकलन विभागाचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सांगितले.