पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागाने मालमत्ताकर भरण्यासाठी 30 जूनपर्यंत 10 टक्के सवलत दिली जाते. सवलतीचा लाभ घेण्यासाठी केवळ 10 दिवस बाकी आहेत. नागरिकांनी बिल भरून सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
तीस जून 2025 पूर्वी ऑनलाईन पद्धतीने मालमत्ताकर बिल भरल्यास 10 टक्के सवलत आहे. महिलांच्या नावावर असलेल्या एका मालमत्तेसाठी 30 टक्क्यांपर्यंत सवलत आहे. (Latest Pimpri News)
दरम्यान, महिला बचत गटांमार्फत 6 लाख 35 हजार मालमत्ताधारकांना घरोघरी जाऊन बिलांचे वाटप केले आहे. त्याचसोबत अनेक मालमत्ताधारकांना जप्तीच्या नोटीसा देण्यात आल्या आहेत. लवकरच जप्तीची कारवाईही केली जाणार आहे.
या मोहिमेमुळे एप्रिल ते 19 जून दरम्यान एकूण 359 कोटी 85 लाख रुपयांचा मालमत्ताकर जमा झाला आहे. तसेच, थकबाकीदारांकडून प्राप्त झालेल्या चेकपैकी न वटलेल्या चेकची एकूण रक्कम 10 कोटी 15 लाख रुपये आहे. शा मालमत्ताधारकांना नोटीस देत त्यांना त्यांची रक्कम रोख व ऑनलाइन माध्यमातूनच भरावी लागणार आहे, असे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सांगितले.
30 जूनपर्यंत लागू असणार्या सवलती
स्वातंत्र्यसैनिक किंवा पत्नीच्या नावावरच्या एका निवासी मालमत्तेस - 50 टक्के सवलत
महिलांच्या नावावरच्या एका निवासी मालमत्तेस 30 टक्के सवलत
40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या दिव्यांग व्यक्तीच्या एका मालमत्तेस 50 टक्के सवलत
संंपूर्ण कराची रक्कम आगाऊ भरणार्यास 5 टक्के सवलत
माझी मिळकत माझी आकारणी योजनेअंतर्गत
नोंदणीकृत मालमत्तेस - 69 टक्के सवलत
नवीन आकारणी झालेल्या मालमत्तेस - 5 टक्के सवलत
सलग 3 वर्षे नियमित कर भरणार्यास - 2 टक्के सवलत
एप्रिल ते जून दरम्यान ऑनलाईनएकरकमी भरणार्यास - 5 टक्के सवलत
माजी सैनिक, शहीद सैनिकांच्याकुटुंबीयांसाठी - 100 टक्के सवलत
इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनला - 2 टक्के सवलत
बिल भरून सूट मिळवा
बचत गटांच्या महिलांनी 6 लाख 40 हजार मालमत्ता धारकांपर्यंत थेट संपर्क साधत बिलांचे वितरण केले आहे. आत्तापर्यंत 359 कोटींहून अधिक रक्कमेचा मालमत्ता कर भरणा झाला आहे. नागरिकांनी उर्वरित काही दिवसांत ऑनलाईन पद्धतीने किंवा थेट रोखीने कर भरून, सवलतींचा लाभ घ्यावा आणि शहराच्या विकासात योगदान द्यावे, असे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी सांगितले.