पिंपरी: कौटुंबिक वादातून चुलत्याने पुतण्यावर प्राणघातक हल्ला केला. ही घटना सोमवारी (दि. 1) सकाळी निगडी येथील ग्लोबल अँड गुरुदत्त पे अँड पार्किंग समोर घडली. याप्रकरणी महेश ज्ञानोबा काळभोर (35, रा. समर्थनगर, निगडी, पुणे) यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, तुकाराम सखाराम काळभोर (60, रा. समर्थनगर, निगडी, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तुकाराम हे फिर्यादीचे चुलते आहेत. त्यांनी फिर्यादीच्या कर्मचार्यास पार्किंगसमोर गाड्या पार्क करू नये म्हणून शिवीगाळ केली. (Latest Pimpri News)
फिर्यादीचा भाऊ जाब विचारण्यासाठी गेला, या कारणावरून आणि जुन्या भांडणाच्या रागातून आरोपीने फावड्याने फिर्यादीच्या भावाच्या डाव्या भुवईवर मारून गंभीर दुखापत केली. तसेच, तुम्हां सर्वांना जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देऊन तो निघून गेला. देहूरोड पोलिस तपास करत आहेत.