अनैतिक संबंधाच्या संशयावरुन खून File Photo
पिंपरी चिंचवड

Crime News | अनैतिक संबंधाच्या संशयावरुन खून

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या न संशयातून एका तरुणाचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून करण्यात आला. हा त बावधन पोलिस चौकीजवळील नर्सरीमध्ये बुधवारी (दि. १८) मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

प्रवीणकुमार महतो (२५, मूळ रा. मुजफ्फरनगर, बिहार) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. राजीवकुमार सिंह (३३) आणि नी धीरजकुमार रमोदसिंग (२०, दोघे रा. न्च मुजफ्फरनगर, बिहार) अशी अटक करण्यात वे आलेल्या आरोपींची नावे आहेत. क वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, बावधन चौकीजवळ असलेल्या एका नर्सरीमध्ये एकाचा धारदार हत्याराने गळा चिरून खून करण्यात आल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली.

त्यानुसार, पोलिसांनी चौकशी करून प्रवीणकुमार याची डा ओळख पटवली. दा नी दरम्यान, प्रवीणकुमार याच्याकडे एका बड्या कंपनीचे गार्डनिंगचे कंत्राट होते. त्यामुळे या खुनामागे व्यावसायिक वाद असण्याचा संशय पोलिसांना होता.

पोलिसांनी सुरुवातीला व्यावसायिक स्पर्धकांची झाडाझडती घेतली; मात्र यामध्ये काही आढळून आले नाही. त्यामुळे अनैतिक संबंधाचा अँगल चाचपडण्यास सुरुवात केली. त्या वेळी चित्र स्पष्ट झाले. त्यानुसार, पोलिसांनी राजीवकुमारबाबत माहिती मिळवली. तपासाची चक्रे फिरवत पोलिसांनी तत्काळ दोघांना ताब्यात घेतले.

राजीवकुमार सिंह याला त्याच्या पत्नीसोबत प्रवीणकुमार महतो याचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्या कारणावरून एका साथीदारासोबत मिळून त्याने प्रवीणकुमार याला ठार मारण्याचा कट आखला. प्रवीणकुमार झोपेत असताना त्याचा गळा चिरून खून केला. तपास हिंजवडी पोलिस करत आहेत. खून केल्यानंतर राजीवकुमार आणि धीरजकुमार हे दोघे मानपाडामार्गे पुन्हा बिहार येथे पळून जाण्याच्या तयारीत होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर हिंजवडी पोलिसांनी मानपाडा येथे जाऊन दोघांना अटक केली.

खून करण्यासाठी बिहारहून पुण्यात

प्रवीणकुमार याचा खून करण्यासाठी राजीवकुमार हा बिहारवरून पुण्यात आला. त्यानंतर त्याने साथीदाराच्या मदतीने कट आखला. त्यानुसार, रात्रीच्या वेळी प्रवीणकुमार याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांच्या तपासातून उघड झाला आहे.

फोटो व्हायरल झाल्याने बळावला संशय

प्रवीणकुमार आणि राजीवकुमार यांच्या पत्नीचे अनैतिक संबंध मागील चार वर्षापासून असल्याचा संशय राजीवकुमार याला होता. यावरून त्यांच्यात वादही झाले होते. मागील महिन्यात प्रवीणकुमार आणि राजीवकुमार याच्या पत्नीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर संशय बळावत गेल्याने राजीवकुमार पुण्यात आला आणि त्याने हा खून केला.

शिक्षक बनला राक्षस

आरोपी राजीवकुमार प्राथमिक शाळेत शिक्षक आहे. आपल्या पत्नीचे संबंध असल्याचे समजल्यानंतर राजीवकुमार प्रचंड चिडला होता. दरम्यान, त्याने प्रवीणकुमार याचा ठावठिकाणा शोधून त्याचे शीर धडापासून वेगळे करण्याचा प्रयत्न केला. एका शिक्षकाने अशा क्रूर पद्धतीने खून केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT