Metro News File Photo
पिंपरी चिंचवड

Metro News | मेट्रोला बाप्पा पावला !

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

गणेशोत्सवाच्या काळात पिंपरी मेट्रो स्टेशनवरून पुण्यातील शिवाजीनगर व सिव्हिल कोर्ट स्टेशनपर्यंत मेट्रोने प्रवास करत नागरिकांनी गणरायांचे भक्तिभावाने दर्शन घेतले. शनिवारी (दि.१४) साप्ताहिक सुटीच्या दिवशी सर्वाधिक ९४ हजार ४८४ नागरिकांनी मेट्रोतून सफर केली.

तर, गणेश विर्सजन मिरवणूक पाहण्यासाठी मंगळवारी (दि. १७) नागरिकांनी मेट्रो सेवेचा लाभ घेतला. यातून सर्वाधिक १३ लाख ९८ हजार १२३ रुपयांचे उत्पन्न महामेट्रोच्या तिजोरीत जमा झाले. तर, गणेशोत्सवातील तीन दिवसांत मेट्रोला दिवसाला दहा लाखांपेक्षा अधिकचे उत्तन्न मिळाले.

पुण्यातील गणेशोत्सवाला ऐतिहासिक परंपरा आहे. तेथील गणेश मंडळाचे देखावे आणि भव्य तसेच, आकर्षक गणेश विसर्जन मिरवणूक सोहळा पाहण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक पुण्यात जातात. शहरातील नागरिकांनी पुण्यात जाण्यासाठी मेट्रोने प्रवास करण्यास सर्वाधिक पसंती दिली.

नागरिकांनी सहकुटुंब व मित्रमंडळींसह गणेशोत्सवाचा आनंद लुटला. त्यामुळे मेट्रो व स्टेशन गर्दीने फुलून गेले होते. दररोज ४० हजार लोक मेट्रोने प्रवास करतात. गणेशोत्सवात ही संख्या तब्बल १ लाखापर्यंत पोहचली होती. गणेश आगमनाच्या दिवशी शनिवार (दि. ७) ते सोमवार (दि. १६) पर्यंत अशी मेट्रो सेवा रात्री बारापर्यंत सुरु होती.

विसर्जनाच्या दिवशी मंगळवारी (दि.१७) मेट्रोसेवा रात्रभर सुरू होती. नागरिक तसेच, तरुणांची संख्या मोठी होती. मेट्रोने शिवाजीनगर किंवा सिव्हिल कोर्टपर्यंत जावून अनेक नागरिक विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी लक्ष्मी रस्ता, कुमठेकर चौक, अलका टॉकीज चौक, टिळक रस्ता पायी जात होते. मिरवणुकीचा आनंद घेतल्यानंतर पुन्हा मेट्रोने प्रवास करत आपले घर गाठत होते.

तीन दिवस ८० हजारांच्या पुढे प्रवासी टप्पा

गणेशोत्सवातील प्रवासी संख्या दुप्पटीपेक्षा अधिकने वाढली होती. उत्सावातील ११ दिवसापैकी तीन दिवस मेट्रोची प्रवासी संख्या ८० हजारांच्या पुढे गेली होती. शनिवारी (दि. १४) ९४ हजार ८४८, रविवारी (दि. १५) ८२ हजार ६०१ आणि विसर्जनाच्या दिवशी मंगळवारी (दि. १७) सर्वाधिक ९२ हजार ८४३ जणांनी मेट्रोतून प्रवास करीत गणेशोत्सवाचा आनंद घेतला.

शेवटच्या दिवशी सर्वाधिक १३ लाख ९८ हजार १२३ रुपयांचे उत्पन्न जमा झाले. गणेशोत्सवात मेट्रोचा कोटीचा गल्ला गणेशोत्सव ७ सप्टेंबरला सुरू झाला. त्या उत्सवाची अकराव्या दिवशी १७ सप्टेंबरला सांगता झाली. या अकरा दिवसांत मेट्रोने तब्बल ९२ हजार ८४३ जणांनी प्रवास केला. त्यातून महामेट्रोला ९९ लाख ५६ हजार ५०७ रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT