Vadgaon Nagar Panchayat Pudhari
पिंपरी चिंचवड

Maval ZP Election: मावळ तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचे चित्र स्पष्ट

उमेदवारी माघारीनंतर थेट लढती; काही ठिकाणी तिरंगी सामना

पुढारी वृत्तसेवा

वडगाव मावळ: मावळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाच जागांसाठी तर पंचायत समितीच्या जागांसाठी उमेदवार रिंगणात असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले व सहाय्यक अधिकारी विक्रम देशमुख यांनी दिली. दरम्यान, काही ठिकाणी काँग््रेास, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार असल्याने संबंधित ठिकाणी तिरंगी तर इतर सर्व ठिकाणी भाजप राष्ट्रवादी अशी सरळ लढत राहणार आहे.

जिल्हा परिषदेच्या पाच जागांसाठी उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. तर पंचायत समितीच्या जागांसाठी उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. दाखल झालेल्या अर्जांच्या छाननी प्रक्रियेत उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्याने उर्वरित अर्ज वैध ठरले होते. दरम्यान, आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरच्या दिवशी जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे जिल्हा परिषदेसाठी व पंचायत समितीसाठी उमेदवार प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात राहिले आहेत.

निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांपैकी प्रामुख्याने कुसगाव काले जिल्हा परिषद गटातील भाजपचे ज्येष्ठ नेते माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, वराळे गणातील राष्ट्रवादीचे संतोष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ तसेच विजय शिंदे, इंदोरी गणातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी रमेश व सोमाटणे गणातील भाजपा किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष सुभाष या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह जणांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतले. यामध्ये डमी अर्ज दाखल केलेल्या बहुतांश समावेश आहे.

जिल्हा परिषद गटनिहाय उमेदवार पुढीलप्रमाणे :

  • टाकवे बु नाणे गट : मधुकर लहू कोकाटे (भाजप), अशोक दाते (राष्ट्रवादी अनंता हनुमंत पावशे

  • इंदोरी वराळे गट : संदीप दाभाडे मेघा प्रशांत भागवत (भाजप)

  • खडकाळा कार्ला गट : आशा बाबूराव वायकर (भाजप), दीपाली दीपक हुलावळे

  • कुसगाव बु. काले गट : दत्तात्रय शंकर गुंड (भाजप), भगवान (राष्ट्रवादी संतोष गबळू राऊत धीरज सुधीर (अपक्ष)

  • सोमाटणे चांदखेड गट : शीतल अविनाश गराडे (भाजप), मनीषा नितीन मुऱ्हे

  • पंचायत समिती गणनिहाय उमेदवार पुढीलप्रमाणे :

  • टाकवे गण : अश्विनी सोमनाथ कोंडे प्राची देवा गायकवाड अनंता शिंदे (काँग््रेास)

  • नाणे गण : संगीता ज्ञानेश्वर आढारी (भाजप), आशा ज्ञानेश्वर मोरमारे चैताली स्वप्नील मोरे (अपक्ष)

  • वराळे गण : राजेंद्र गुलाबराव कडलक रवींद्र निवृत्ती शेटे (भाजप)

  • इंदोरी गण : दिलीप नामदेव ढोरे श्रीकृष्ण अण्णासाहेब भेगडे (भाजप), अजय बाळू केदारी (अपक्ष),

  • खडकाळा गण : प्रकाश बाबूराव गायकवाड (भाजप), समीर खंडू जाधव संदीप शंकर कदम (अपक्ष)

  • कार्ला गण : रंजना सुरेश गायकवाड (भाजप), रेश्मा राजू देवकर अमोल भेगडे (शिवसेना उबाठा)

  • कुसगाव बुद्रुक गण : अविनाश किसन जांभुळकर (राष्ट्रवादी योगेश मुरलीधर लोहार नवनाथ पांडुरंग हरपुडे

  • काले गण : शैला रामचंद्र कालेकर सीमा मुकुंद ठाकर (भाजप),

  • सोमाटणे गण : साहेबराव नारायण कारके बाळासाहेब नथू पारखी (भाजप), संभाजी खंडू

  • चांदखेड गण : सुवर्णा बाळासाहेब घोटकुले (भाजप), सुनिता मनोहर येवले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT